संपादक फिरोज खाटीक :- 9284254906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर !
दि.२४/०५/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक संतोष भांडवलकर, व स्टाफ असे सिंहगडरोड पोलीस स्टेशन हद्दीत मा. वरिष्ठांचे आदेशाने गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार संदिप कांबळे, समीर माळवदकर यांना त्याचे खास बातमीदारामर्फत बातमी मिळाली की, सिहगड रोड पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील ते ओळखत असलेला आरोपी साया पुजारी याच्याकडे एक गावठी पिस्टल असुन विश्रांतीनगर कडुन हिंगणे लंडन ब्रिजकडे जाणा-या जॉगींग ट्रॅकवर कमानीजवळ राजीव गांधी वसाहात हिंगणे पुणे येथे थांबलेला असुन त्याने अंगात फिकट जांभळ्या रंगाचा फुलबाहीचा शर्ट व काळया रंगाची जिन्स पॅन्ट घातली आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळताच त्यांनी सदरची बातमी पोलीस उप-निरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविली असता, वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे मुखजल आदेश दिल्याने, सदर कार्यवाही करणे कामी वरील स्टाफ सह रवाना झाले मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन पाहणीकरता बातमीतील वर्णनाचा इसम हा सदर विकाणी उभा असल्याचे दिसुन आल्याने त्यास वरील स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव व पत्ता साया ऊर्फ साई सुधाकर पुजारी वय १८ वर्षे, रा. सर्वे नं.८०१, भंडारी हॉटेल मागे गल्ली नं. १, दत्तवाडी, सिंहगड रोड, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास सदर ठिकाणी येण्याचे पाहुन निघुन जाण्याचे कारण विचारले असता त्यांने उडवाउडवीची व असमाधानकारक उत्तरे देवु लागल्याने काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याचे उद्देशानेच थांबला असल्याची खात्री झाल्याने पंचासमक्ष त्याची अंगझडती घेता त्याचे त्याचे जवळ ४०,०००/- रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल व २,०००/- रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतुसे मिळून आल्याने त्याचेवर सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.२०८/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३(२५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१), १३५, अन्वये गुन्हा नोंद करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर श्री. सागर कवडे मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) समीर गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार उत्तम तारु, आण्णा केकाण, सतिश मोरे, विकास बांदल, सागर शेडगे, तानाजी सागर, विनायक मोहिते, संदिप कांबळे, समीर माळवदकर, राहुल ओलेकर, यांचे पथकाने केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























