संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर !
दिनांक ०४/५/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ६ कडील पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड व पोलीस अंमलदार असे फुरसुंगी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर व नानासाहेब मोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदरामार्फत बातमी मिळाली की, पावर हाऊस फुरसुंगी पुणे या ठिकाणी दोन इसम छोटा हत्ती टेम्पो चोरी करुन थांबले आहेत. सदर बातमीच्या अनुषंगाने बातमीचे ठिकाणी जावुन टॅम्पोचा शोध घेतला असता, पावर हाऊस ओव्हर ब्रीजचे खाली रस्त्याचे बाजुला फुरसुंगी पुणे या ठिकाणी टेंम्पो क्रमांक के.ए. ७१ ०५७८ जवळ दोन इसम संशयितरित्या उभे असल्याचे दिसुन आले.
सदर इसमांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता, त्यांनी आपले नावे १) कन्हैयासिंग कालुसिंग टाक, वय. ३३ वर्षे, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर पुणे २) राजेशसिंग नानकसिंग दुधानी, वय ४८वर्षे रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमांकडे त्यांच्या ताब्यात मिळुन आलेला टैम्पो क्रमांक के.ए. ७१ ०५७८ चे कागदपत्र व टेंम्पोचे मुळ मालकाबाबत चौकशी केली असता त्या दोघांनीही सदरचा टैम्पो काल रात्री त्रिवेणी नगर, चिखली पुणे येथुन कात्रीच्या सहाय्याने चालु करुन चोरला असल्याचे कबुल केले असुन सदरबात चिखली पोलीस स्टेशन गु.र.नं. २६९/२०२६ भा.न्या.सं.क. ३०३ (२) प्रमाणे वाहन चोरीचा गुन्हा दाखल असुन नमुद आरोपी यांचे ताब्यातुन ४,५०,०००/-रु. किं वा छोटा हत्ती टेंम्पो व २०,०००/-रु.किं.चे ०२ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण ४,७०,०००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करुन नमुद आरोपी यांना पुढील कार्यवाहीकामी चिखली पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे श्री. विवेक मासाळ, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ६ गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. सुदर्शन गायकवाड यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार प्रशांत कर्णवर, तानाजी देशमुख, नानासाहेब मोरे, बाळासाहेब सकटे, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे, उमेश शेलार, पल्लवी मोरे, मनिषा लोखंडे व अनिल जामगे यांचे पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























