Homeक्राईमखुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिस्टलसह जेरबंद; येवलेवाडी पोलीस स्टेशन ची धडाकेबाज...

खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपी पिस्टलसह जेरबंद; येवलेवाडी पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा बुगा येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. वरिष्ठांनी बेकायदेशीर अग्नीशस्त्र जवळ बाळगणा-या आरोपी यांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते, त्याप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक करांडे, यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सुचना प्रमाणे तपास पथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल नेवसे व तपासपथक हे वेळोवेळी रेकॉर्डवरिल आरोपी चेक करुन त्यांची झडती घेवुन तपासणी करत होते सदरप्रमाणे कार्यवाही करुन माहिती काढत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार अभिजीत जाधव व विजय खेंगरे यांना माहिती प्राप्त झाली की, हवेली पोलीस ठाणे कडील खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्हयात फरार असणारा रेकॉर्डवरील आरोपी नामे राहुल सुनिल कुचेकर, वय २५ वर्षे, रा. जय शंकर बिल्डिंग, फ्लॅट नं १०१, पहिला मजला सदाशिव बिबवेनगर, बिबवेवाडी पुणे हा बेकायदेशीर अनीशस्त्र जवळ बाळगुन फिरत असतो. तो दि.०२/०५/२०२६ रोजी पानसरेनगर भागात कमरेला पिस्टल सारखे हत्यार लावून अंगात पांढरे व पिवळ्या रंगाचे पट्टे असलेला टी शर्ट व काळे रंगाची ट्रक पॅन्ट घालुन फिरत असल्याची माहिती मिळाली.

त्याप्रमाणे सदर संबधीत इसमाचा शोध घेत असताना तो येवलेवाडी गावातुन पानसरेनगर कडे जाणारे कच्चा रोडचे शेजारील पत्र्याचे शेडचे आडोशाला कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे दिसले. तेव्हा त्यास स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव राहुल सुनिल कुचेकर, वय २५ वर्षे, रा. जय शंकर बिल्डिंग, फ्लॅट नं.१०१, पहिला मजला सदाशिव बिबवेनगर, बिबवेवाडी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेतले पासुन तो सतत त्याचे कमरेच्या पुढील बाजुस उजव्या बाजुला हात लावून काही तरी लपवत असल्याचे दिसले. त्यास कमरेला वारंवार का, हात लावत आहे? याबाबत विचारणा करता तो तडवा उडवीचे उत्तरे देवु लागला तेव्हा त्याची झडती घेता त्याचे कमरेला पॅन्टच्या आत खोचलेला एक देशी बनावटीचे पिस्टल व पुढील बाजुच्या डावे खिशामध्ये १ जिवंत काडतुस मिळुन आली सदर इसमाच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाणे पुणे गुरन. ३०/२०२६, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे विरुध्द यापुर्वी कोंढवा, बिबवेवाडी, हवेली, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे एकुण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परि.०५ श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्रीमती नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिपक करांडे, यांच्या मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक स्वप्निल नेवसे व पोलीस अंगलदार अरुण किटे, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, गणेश चिचकर, लक्ष्मण होळकर, विजय खेगरे, अनिल बनकर, मयुर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!