Homeक्राईमहडपसरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; २४ तासांत आरोपी अटकेत, जलदगतीने दोषारोपपत्र दाखल.

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; २४ तासांत आरोपी अटकेत, जलदगतीने दोषारोपपत्र दाखल.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २९/०३/२०२६ रोजी सकाळी ०९/०० वा. चे सुमारास हडपसर परिसरातील केशव क्रिएशन जनरल स्टोअर्स, राम मंदिराजवळ किराणा सामान घेणेसाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीशी एका अज्ञात इसमाने चार्जर मागण्याच्या बहाण्याने जवळीक साधत लगट करण्याचा प्रयत्न करुन तिचा विनयभंग केला. सदर बाबत तक्रार प्राप्त होताच हडपसर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं २४६/२०२६ अन्वये भा.न्या.सं.क. ७४ तसेच बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) क. ८,१२ प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास म. पोलीस उप निरीक्षक प्रियंका कोलेवाड यांचेकडे सुपूर्त करणेत आला.

तपासी अधिकारी यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देवुन घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासुन ते गुन्हयात पंचनाम्याने जप्त केले. सी.सी.टी.व्ही. फुटेज व इतर तांत्रीक विश्लेषणाव्दारे यातील अज्ञात आरोपीची तपासी अधिकारी यांनी ओळख पटवुन त्यास गुन्हयात निष्पन्न केले व त्यास गुन्हयात शोध घेवुन तात्काळ अटक करुन त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव ओमकार बाळकृष्ण कोरडे वय २६ वर्षे रा. प्रफुल्ल कॉलनी, काळेपडळ पुणे असे सांगितले. त्याचेकडुन त्याने गुन्हयाचेवेळी परिधान केलेला निळा कर्ता तसेच MH-12-YF-5246 क्रमांकाची अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आली. तसेच यातील साक्षीदारांकडे तपास करुन त्यांचे जलदगतीने जबाब नोंदवीणेत आले आहेत.

आरोपी विरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन अत्यंत जलदगतीने परिणामकारक तपास करत तपासी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक कोलेवाड यांनी अवघ्या २४ तासांच्या आत दोषारोपपत्र तयार करुन मा. न्यायालयात सादर केले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ६ पुणे शहर श्री.डॉ राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक सुप्रीया कोलेवाड, पोलीस उप-निरीक्षक हसन मुलाणी, तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार लोंढे, केसकर, धावडे, पांडे व महिला पोलीस अंमलदार पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!