Homeक्राईमपुणे गुन्हे शाखेची कारवाई: सिग्नलवर चोरी करणाऱ्या टक-टक गँगचा पर्दाफाश.

पुणे गुन्हे शाखेची कारवाई: सिग्नलवर चोरी करणाऱ्या टक-टक गँगचा पर्दाफाश.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.३१/२०२६ भा.न्या.सं.कलम ३०९ (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील अनोळखी आरोपी याचा शोध घेणे बाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट ०१ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अंमलदार जमदाडे, पेरणे, भोसले, हे दाखल गुन्हयाचे सी.सी.टी.व्ही फुटेजची तपासणी करीत असताना दोन संशयीत इसमांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, यांना त्यांचे गुप्त बामतीदारामार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हयातील संशयित इसम हे समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये येणार आहेत. अशी बातमी मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना कळविताच ते स्वतः व स्टाफ असे मिळुन लॉजच्या आसपास सापळा रचुन थांबले असता सदर ठिकाणी मिळालेल्या बातमीतील वर्णनाचे दोन इसम आले असता त्यांना वर नमुद स्टाफच्या मदतीने ताब्यात घेवुन त्यांना पोलीस निरीक्षक अजित जाधव व स्टाफची ओळख सांगितली. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) रवी ओमप्रकाश कोहली वय ३८ वर्षे, रा. घर नं.४१६, कमबोहगेट, मेरठ सिटी, राज्य उत्तरप्रदेश २५०००२, २) अफजल कय्युम अब्बासी वय ३८ वर्षे, रा, घर नं. १ बी ९६९, वॉर्ड नं. ५७, सेक्टर – ०३, माधव पुरम मेरठ, मेरठ सिटी, उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले त्यानंतर दोन्ही इसमांकडे फरासखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.३१/२०२६ भा.न्या. सं . कलम ३०९ (४) प्रमाणे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे कबुली दिलेने त्यांचेकडे अधिक तपास करता त्यांनी पुणे शहरामध्ये अशा प्रकारचे आणखीन गुन्हे केल्याचे सांगुन अलंकार पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ११/०२/२०२६ रोजी १८/४१ वा सुमारास सारस्वत बँके समोर कर्वे रोड कोथरुड पुणे येथील रस्त्याचे कडेला थांबलेल्या एका फोर व्हिलर कारच्या ड्रायव्हर सिटवर एक इसम बसलेला होता त्याचे बाजुच्या सिटच्या उघडया असलेल्या खिडकीमधुन हात घालुन सिटवर असलेला एक भगव्या रंगाचा अॅपल कंपनीचा आयफोन १७ प्रो व एक पांढ-या रंगाचे पॉकेट हे दोघांनी चोरी केल्याचे सांगितले असता त्याबाबत आम्ही अलंकार पोलीस स्टेशन येथे चौकशी केली असता सदर बाबत अलंकार पोलीस स्टेशन गु.र.नं. २७/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे दिसुन आले आहे.

त्याचप्रमाणे विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक १९/०८/२०२५ रोजी विमाननगर चौक पुणे येथे एका स्विफ्ट कार चालकास त्याची कार ही पायावरुन गेली असा बहाणा करुन त्याचे गाडीमधील एक सॅमसंग कंपनीचा व एक वन प्लस कंपनीचा मोबाईल चोरी केला असल्याचे सांगितल्याने त्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशन येथे चौकशी केली असता सदर बाबत विमानतळ पोलीस स्टेशन गु.र.नं.४१३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम २०२३ चे कलम ३०३ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे दिसुन आले आहे. सदर आरोपींनी पुणे शहरामध्ये फरासखाना, अलंकार, विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हे केल्याचे कबुल केल्याने सदर आरोपी यांना पुढील कारवाई करीता फरासखाना पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, श्री.शैलेश संखे मा.सहा पोलीस आयुक्त गुन्हे १, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक अजित जाधव, पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, निलेश साबळे, शशिकांत दरेकर, संदेश काकडे, म.पोलीस अंमलदार ज्योती मुल्का, चा. पो. अंमलदार प्रफुल शेलार यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!