संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर !
पुणे शहरात रस्त्याने एकटे मोबाईलवर बोलत चालणा-या इसमांचे फोन स्पोर्ट बाईकवर भरधाव वेगात येवुन अचानक हिसकावून घेवून चोरी झालेबाबत पर्वती पोलीस स्टेशन हद्दीत ०२ घटनांची नोंद झाली होती सदरबाबत सी.सी.टी.व्ही.चे आधारे पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे यांनी शोध घेतला असता ते वापरत असलेली बाईक यमाहा आर-१५ ही नवी मुंबई येथुन चोरीस गेलेली असल्याचे समजले. सदर बाईकचे मुळ मालकाशी सतत संपर्क करुन त्या बाईकवर पुणे शहरात वाहतुक पोलीसातर्फे करण्यात आलेल्या चलानाचे माहिती वरुन सदर चोरटयांचा पाठलाग करुन त्यांना पकडले असता त्यांचेकडुन ०८ मोबाईल फोन व चोरीची मोटार सायकल जप्त करण्यात आली सदर आरोपींची नावे १) अर्जुन कमलेश सरोज, वय १८ वर्षे सध्या रा. कार्तिकेश्वर हॉटेल शाखा नंबर ०३ त्रीमुर्ती चौक, आंबेगाव पठार, पुणे मुळ रा. राज्य उत्तर प्रदेश. २) इमरान शफीक शेख वय १८ वर्षे, रा. रॉयल जीमजवळ ऊंड्री चौक, पुणे व सेक्टर नं १९, पुनीत कॉर्नर, कोपरीगाव, नवी मुंबई मुळ रा. राज्य झारखंड, ३) रवीकुमार राजेंद्रकुमार वय २१ वर्षे रा. रॉयल जीम जवळ उर्द्री चौक पुणे मुळ उत्तर प्रदेश, ४) प्रदिप कुमार महेंद्रकुमार वय २१ वर्षे रा. किर्तीश्वर हॉटेल, शाखानंबर ०३, त्रिमुर्ती चौक,भारती विद्यापीठ, आंबेगाव पठार, पुणे मुळ रा. राज्य उत्तर प्रदेश अशी असुन ते सर्व परप्रांतीय आहेत. सदर आरोपींना पर्वती पोलीस स्टेशन गु.र.नं-५६/२०२६ भा.न्या.सं.क ३०४, ३ (५) अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त परि-०२ श्री. मिलिंद मोहिते, मा.सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक, सुर्या जाधव, मनोज बनसोड, नाना सोखाडे, सद्दाम शेख, अमित चिव्हे, अमोल दबडे, राकेश सुर्वे यांनी केली .

मुख्य संपादक : – इमरान शेख


























