Homeक्राईमविश्वास संपादन करून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला न्यायालयाची शिक्षा; बाणेर पोलिसांची यशस्वी...

विश्वास संपादन करून चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला न्यायालयाची शिक्षा; बाणेर पोलिसांची यशस्वी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक २४/१०/२०२५ रोजी फियादी यांनी त्याचे आरटीझेन कॅफे या दुकाणा मध्ये काम करणारा त्याचा नोकर नामे निलेश विष्णू कदम वय 31 वर्ष रा. दुरशेत ता. खालापुर जि रायगड याने दुकाणातील दोन मोबाईल व 15 हजार रुपये रोख असा एकूण 29000/- रुपयांचा माल चोरून नेला अशी फिर्याद दिली होती. सदर फिर्यादवरून बाणेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजी नं 247/ 2025 भा. न्या. स कलम 306 नुसार दाखल केला होता. नमुद चोरटा हा गुन्हा केल्या पासून फरार होता. फरार आरोपीचा शोध तपास पथक घेत असतांना नमुद आरोपी हा मुंबई येथे असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. नमुद आरोपीस पथकामधील पोलीस अधिकारी के बी डाबेराव गणेश रायकर, पोलीस अंमलदार बाबासाहेब आहेर, किसन शिंगे यांनी अंधेरी भागात शोध घेवून आरोपीस अटक केली. आरोपी कडून गुन्हयात चोरी गेलेला माल जप्त केला.
तपास अधिकारी बाबासाहेब आहेर यांनी गुन्ह्याचा कसून बारकाईने तपास केला असता नमुद आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे व व्यापा-यांकडे कामास राहून विश्वास संपादन करून त्यांचे कडे चोरी करतो, अशी त्याची गुन्हा करण्याची पध्दत असल्याची माहिती प्राप्त केली. आरोपीस या पुर्वी फरासखाना पोस्टे गुरन 295/2023 भादवि कलम 380 मध्ये तीन महिन्याची शिक्षा झाली होती.
बाणेर गुन्याचे तपासात आरोपी कडून गुन्हयात चोरी केला माल मोबाइल जप्त करण्यात आले होते तसेच तपासात पुरावा नाहीसा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने तपास अधिकारी यांनी गुन्हयात भा न्या स कलम 238 तसेच भा न्यास कलम 13 ची वाढ करून सबळ पुरावे गोळा करून आरोपीचे विरुद्ध दोषारोप पत्र मा न्यायलयात दाखल केले.
मा प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी कोर्ट नं 09 यांनी सदर प्रकरणात नियमित सुनावणी घेऊन प्रकरण नियमित चालविले. सदर प्रकरणात सरकार तर्फे सरकारी वकील म्हणून श्रीमती शैला घोडेस्वार यांनी कामकाज पाहले तर कोर्ट पैरवी म्हणून पो हवा 5720 शंकर सोनवने यांनी कामकाज पाहून महत्त्वाची भूमिका बजावली.
सदर प्रकरणात सर्व साक्ष पुराव्याचे अध्ययन करून मा न्यायमुर्ती श्री अमोल शिंदे साहेब, प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी कोर्ट नं 09 यांनी आरोपीस भान्यास कलम 306 मध्ये तिन महिने भा. न्या. स. कलम 216 नुसार 03 महीने तसेच आरोपीने पूर्वी चोरीचे गुन्ह्यात शिक्षा झालेली असतांनाही पुन्हा गुन्हा केल्याने भा न्या कलम 13 नुसार सहा महिण्याची शिक्षा केली आहे.

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त, परि. ४, पुणे शहर श्री. चुलूमुला रजनीकांत, मा. सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग, पुणे शहर श्री.विठ्ठल दबडे, यांचे सुचने व मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चंद्रशेखर सावंत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, गणेश रायकर, पोलीस अंमलदार गणेश गायकवाड, बाबासाहेब आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, प्रदिप खरात, प्रितम निकाळजे, गजानन अवातिरक, शरद राऊत, रोहीत पाथरुट, स्वप्नील मराठे बाणेर पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!