संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !
दि. २८/०१/२०२६ रोजी फिर्यादी नामे सोमसिंह मानसिंह जोधा राठोड, वय ४३ वर्षे, व्यवसाय- सराफ व्यवसाय रा. अजिंक्य अपार्टमेंट गल्ली नं.०२, फ्लॅट नं.०४,राठी बंगल्याच्या विरूध्द बाजुला सुखसागर नगर कात्रज पुणे यांनी फिर्याद दिली की, “दिनांक २७/०१/२०२६ रोजी रात्रौ १०.०० वा.चे सुमारास महाराणी साडी दुकानाचे बाजुला, गल्ली नं.०२ चे रोडवर, सुखसागरनगर, कात्रज, पुणे तसेच अनमोल मॅचिंग सेंटर याठिकाणी पांढरे रंगाचे नंबर प्लेट नसलेल्या अॅक्टीव्हा मोपेड गाडीवरून आलेले अनोळखी तिन इसम डोक्यात कॅप घातलेले वय अदाजे २० ते २५ वर्षे त्यापैकी पांढरे रंगाचा शर्ट व हुडी घातलेल्या दोघांनी त्यांचे हातातील धारदार हत्याराने फिर्यादी यांचा भाऊ भरतसिंह मानसिंह जोधा राठोड, वय- ४१ वर्षे यांचे डोक्यात, दोन्ही हातावर वार करून व तिसऱ्या इसमाने लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच मदतीसाठी आलेल्या लोकांना त्याचे हातातील हत्यार हवेत फिरवून मध्ये आल्यास तुम्हालाही मारून टाकेन अशी धमकी देवून दहशत केली व जातेवेळी दुकानावर दगड फेकून मारले म्हणून फिर्यादी यांनी पांढरे रंगाचे अॅक्टीव्हा मोपेड वरील अनोळखी तिन इसमाविरूध्द तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०९(१), ३५१(४), ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)सह १३५ व क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल आहे.”
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते व पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे यांचे आदेशाने तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, तसचे तपास पथकातील पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, रक्षित काळे, ज्योतिष काळे असे दाखल गुन्ह्यतील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असताना सुमित ताकपेरे, विशाल जाधव यांना त्यांचे गुप्त बातमिदारामार्फत माहिती मिळाली की, दाखल गुन्ह्यातील पाहीजे आरोपी ‘१) अभिषेक तुळजाराम क्षीरसागर, वय- २१ वर्षे, व्यवसाय- पेटींग, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, गल्ली नं.५, घर क्र. ४, अप्पर, बिबवेवाडी, पुणे, २) ओंकार अनील शिंदे, वय २३ वर्षे, रा. स.न. ६३१, ओंकार नगर, अब्दुल चिकन सेंटर, बिबवेवाडी, पुणे, ३) आशीष रमेश शिंदे, वय- २० वर्षे, रा. दत्तकृपा बिल्डींग, फ्लॅट नं ०२, लेन नं. ०४, पी एम टी कॉलणी, अप्पर बिबवेवाडी, पुणे.’ असे असून अनु.क्र. ०१ व ०२ सध्या दत्तवाडी, पुणे येथे असून अनु.क्र. ०३ हा त्याचे राहाते घरी आहे.” वगैरे मजकुरची माहिती मिळाल्याने लागलीच मा. वरिष्ठांचे आदेशाने तपास पथक अधिकारी व अंमलदार यांनी वर नमुद आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी दाखल गुन्हा केलेचे कबूल केलेने त्यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांची प्रथम पोलीस कोठडी व नंतर मा. न्यायालयीन कोठडी मंजूर करून त्यांना येरवडा कारागृहात रवाना केले आहे. तसेच दाखल गुन्ह्यातील ऊर्वरीत तीन आरोपीतांचा शोध घेवून त्यांना अटक करणेची तजवीज ठेवली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साो, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त मिलिंद मोहिते, परिमंडळ २ पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राहूल आवारे, भारती विद्यापीठ विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अमोल भुवड, पोलीस हवालदार संजय गायकवाड, विनोद जाधव, संतोष जाधव, पोलीस अमंलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव, रक्षित काळे, शिवाजी येवले, ज्योतिष काळे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























