Homeक्राईमहडपसरमधील “महावीर ज्वेलर्स” दरोडा २४ तासांत उघडकीस; ३ आरोपी अटक, ३ विधीसंघर्षीत...

हडपसरमधील “महावीर ज्वेलर्स” दरोडा २४ तासांत उघडकीस; ३ आरोपी अटक, ३ विधीसंघर्षीत बालक ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दि.०३/०१/२०२६ रोजी ०५/०० ते ०५/३० वा. चे दरम्यान शिवचैतन्य कॉलनी नं.१ शेवाळेवाडी पुणे येथील “महावीर ज्वेलर्स” या सराफ दुकानात ४/५ अनोळखी चोरटयांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवुन काउंटरची काच फोडुन दुकानातील डीस्प्ले बोर्ड व कपाटातील एकुण ५२८.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने असा एकुण रु.५२,८८,०००/- रु. किं चा मुददेमाल दरोडा टाकुन जबरीने घेवुन गेले बाबत फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं.०४/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३१०(२), ३१२ प्रमाणे दि. ०४/०१/२०२६ रोजी दाखल आहे.
नमुद गुन्हा घडताच तात्काळ घटनास्थळी भेट देवुन मा. वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ व युनिट ५ गुन्हे या शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेसह सरकारी व खाजगी वाहनांनी मांजरी, लोणीकाळभोर, हडपसर पोलीस स्टेशन हददीत सीसीटीव्ही फुटेज, तांत्रीक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांचे मार्फत आरोपींचा शोध घेत असताना दि.०४/०१/२०२६ रोजी १५/०० वा. द्राक्ष संशोधन केंद्राजवळ मांजरी बु” पुणे येथे ३ संशयीत मिळुन आले. त्यांना जागीच ताब्यात घेवुन नांव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नांवे १) विधीसंघर्षीत बालक २) प्रविण महादेव शिंदे, वय १८ वर्षे, रा. कानीफनाथनगर हनुमान मंदीराजवळ गंगानगर फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे. ( अटक) ३) भावेश राजेश चव्हाण, वय २० वर्षे, रा.स. नं.१० उन्नतीनगर रविदर्शनजवळ हडपसर पुण ( अटक) अशी सांगीतली. सदर आरोपींकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्यांनी सदर गुन्हा त्यांचे साथीदार ४) राजदीप संतोष जगताप, वय २१ वर्षे, रा. लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे ( अटक) व इतर तीन विधीसंघर्षीत बालक ( ताब्यात) यांचेसह केलेचे सांगीतले. नमुद पाहीजे आरोपींचा तांत्रीक विश्लेषणाव्दारे शोध घेता ते छत्रपती संभाजीनगर येथे गेलेबाबत माहीती प्राप्त झालेने युनिट ५ गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी श्री. अभिजीत पवार व पोलीस अंमलदार यांना तात्काळ रवाना केले असता तेथे दोन विधीसंघर्षीत बालक व राजदीप संतोष जगताप, रा. लोणीकाळभोर ता. हवेली जि. पुणे हे मिळुन आले. तसेच सदर विधीसंघर्षीत बालक यांचेकडे गुन्हयातील गेले मालापैकी एकुण २२४.९२ ग्रॅम वजनाचे पिवळया धातुचे दागीने व १८३ ग्रॅम वजनाचे सिल्व्हर रंगाचे धातुचे दागीने मिळुन आले. (वरील दागीन्याची प्रतवारी व वजन करणे बाकी आहे) तसेच वरील मिळुन आलेले ३ आरोपी व ३ विधीसंघर्षीत बालक यांची ससुन हॉस्पीटल पुणे येथे मेडीकल तपासणी करुन त्यांना पुढील कारवाई कामी मांजरी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे हजर केले आहेत.
सदर गुन्हा मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री. निखील पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. छगन कापसे, सहा.पो.नि.सी.बी. बेरड, पो.उप निरी. एस. जे. तानवडे, पोलीस अंमलदार राजेश लोखंडे, राजु पुणेकर, संतोष होले, परेश सावंत, राहुल इंगळे, संदीप येळे, विनायक येवले, विक्रांत सासवडकर, प्रफुल्ल मोरे सर्व नेमणुक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा यांनी उघडकीस आणला आहे. तसेच नमुद कारवाईमध्ये पो.उप निरी. अभिजीत पवार, अमित कांबळे, अकबर शेख, गणेश माने, राहुल ढमढेरे सर्व नेमणुक युनिट ५, गुन्हे शाखा पोलीस अंमलदार जहाँगीर पठाण, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, विशाल इथापे सर्व नेमणुक युनिट ४ गुन्हे, सहा. पो. नि. मदन कांबळे, पोलीस अंमलदार कानीफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश ताकवले सर्व नेमणुक युनिट ६, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!