Homeक्राईमआंदेकर टोळीच्या दहशतीला मोठा धक्का देत, गुन्हे शाखा युनिट १ आणि खंडणी...

आंदेकर टोळीच्या दहशतीला मोठा धक्का देत, गुन्हे शाखा युनिट १ आणि खंडणी विरोधी पथक १ यांनी संयुक्त कारवाईत टोळीच्या एका हस्तकास घातक अग्निशस्त्रांसह जेरबंद केले आहे.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

युनिट १ व खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई !

सन २०२४ रोजी बंडु आंदेकर याचा मुलगा वनराज आंदेकर याचा खुन झाला होता. त्यामुळे बंडु आंदेकर व त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर हे त्यांच्या टोळीतील सदस्य व त्याच्या हस्तका मार्फत संपर्कात असलेल्या मुलांचे वेगवेगळे गट तयार करून वनराज आंदेकर याच्या खुनामध्ये सामील असलेल्या आरोपींच्या नातेवाईंकांना टारगेट करून कट रचून त्यांना मारुन त्यांच्या टोळीची दहशत वाढवित आहेत. त्या प्रमाणे त्यांनी वनराज आंदेकर यांच्या खुनाच्या कटामध्ये सामील असलेला आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळेचा खुन हा नोव्हेंबर २०२५ रोजी घडवून आणला होता. त्यामुळे बंडु आंदेकर व त्याचे टोळीतील बाहेर असलेले सदस्य यांची माहिती घेवून त्यांचेकडे काही शस्त्रे आहेत अगर कसे याची माहिती काढणेबाबत व त्यांचे वर कारवाई करणेबाबतचे आदेश मा. वरिष्ठांकडून प्राप्त झाले होते.
त्याप्रमाणे दि. १५/१२/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे परिमंडळ १ च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार ब.नं. ६७८२ अमोल आवाड व पो.अं./८८०२ मयुर भोकरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन गोपनीय माहिती मिळाली की, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला इसम नामे तन्मय गणेश कांबळे रा. नाना पेठ, राजेवाडी, पुणे याचेकडे एक पिस्टल असून ती त्याने लपवून ठेवलेली आहे. सदरची बातमी खं. वि.प. १ चे प्रभारी अश्विनी जगताप यांना सांगितली असता त्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही वेळाने आम्ही तन्मय गणेश कांबळे यास त्यास त्याचे राहते घर नाना पेठ, राजेवाडी, पुणे येथून दुपारी १२.१५ वा. ताब्यात घेवून त्याचेकडे असलेल्या पिस्टल बाबत चौकशी केली असता त्याने त्याचे कडील पिस्टल हे त्याचा मित्र विधी संघर्षग्रस्त बालक याचेकडे ठेवले असल्याचे सांगितले तसेच तो सध्या स.नं. २८, डोके तालीमच्या मागे, नाना पेठ, पुणे येथील बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर याच्या हिच आईची इच्छा या चार मजली घरामध्ये राहत असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे युनिट ०१ कडील श्रे. पोलीस उप निरीक्षक राहुल मखरे व पो.शि. ९८८४ निलेश साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडुन गोपनीय माहिती मिळाली की, आंदेकर टोळीशी संपर्कात असलेला विधीसंघर्षग्रस्त बालक याचेकडे एक पिस्टल असून ती त्याने त्याचे होंडा अॅक्टीव्हा गाडीच्या डिगीमध्ये लपवून  ठेवलेली आहे. व सदरची गाडी ही बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर याच्या हिच आईची इच्छा याचे घरासमोर पार्क केली आहे. सदरची बातमी युनिट १ चे प्रभारी अजित जाधव यांना सांगितली असता पोलीस निरीक्षक अजित जाधव हे त्यांचे स्टाफसह सदर ठिकाणी पोहचले असता सदर ठिकाणी खंडणी १ कडील अधिकारी व स्टाफसुध्दा तेथे पोहचले होते. त्यानंतर सदर ठिकाणावरील टु व्हिलरची झडती घेतली असता त्यामध्ये ८०,०००/- रुपये किंमतीच्या दोन लोखंडी पिस्टल, २,०००/- रु किं.ची एक लोखंडी कुकरी, १५,०००/- रुची एक एअर पिस्टल, इतर वस्तु मिळाल्याने विधीसंघर्षग्रस्त बालक हा बंडु आंदेकर टोळीतील गुंड तुषार वाडेकर व स्वराज वाडेकर याच्या हिच आईची इच्छा या घरामध्ये राहत असल्याची माहिती मिळुन आल्याने सदर घराची झडती घेतली असता घरामध्ये काहीएक मिळुन आले नाही. त्यानंतर सदर बिल्डींग शेजारी आंदेकर कुटुंबियाकडे ताबा असलेल्या बिल्डींगची झडती घेतली असता सदर ठिकाणांवरुन १८,८४,३८९/- रु. किंमतीचे चांदीचे व पिवळया धातुचे दागिने व विविध वस्तु, मालमत्ता संदर्भातील कागदपत्रे, १७,१५,२६०/- रोख रुपये,१७,२६,०६०/- रुपयाचे हार्ड डिस्क, पेन ड्रायव्ह, मेमरी कार्ड, बँकेची पासबुक इत्यादी मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी यास मा. न्यायालयाने दि. १९/१२/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर व मा. श्री. निखील पिंगळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, मा. श्री. विजय कुंभार सहा पोलीस आयुक्त गुन्हे ०१ पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री अश्विनी जगताप पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. अजित जाधव, पोलीस निरीक्षक, युनिट १, गुन्हे शाखा, श्री. राहुल मखरे श्रे. पोलीस उप-निरीक्षक, पो.हवा. ब.नं. ६७८२ अमोल अवाड, पो. अंमलदार / ८८०२ मयुर भोकरे, पो.अं./९८८४ साबळे, पो.हवा/७५४२ रहिम शेख, पो.हवा / ६४५७ प्रफुल्ल चव्हाण, पो. अं. / ८३९८ नितीन बोराटे, पो.अं./८१९३ अमर, पो.अं/८३४७ दयानंद तेलंगे, पो.हवा / ६९४९ बाबर, पो.हवा / ७६७७ काकडे, पो.हवा / ८२०८ पेरणे, पो.हवा / ६४८५ भोसले, पो.हवा.३०२३ दरेकर, पो.शि.९१२२ कांबळे, पो.शि.२४८१ मठपती, पो.हवा/११३५ नितीन कांबळे, पो.हवा/७२९२ राजेंद्र लांडगे, पो. हवा / ६७१४ दुर्योधन गुरव, पो. हवा / १५८९ बालारफि शेख व वाहन चोरी दरोडा पथकातील म.पो.हवा / ६२७८ रेहाना शेख यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!