संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर
मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर व मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो, गुन्हे, पुणे शहर यांनी पुणे शहर आयुक्तालयातील मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपी पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवून मोक्का गुन्हयातील पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणेचे आदेश दिलेले होते.
त्याअनुषंगाने दिनांक ०९/११/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस शिपाई ८८०२ मयुर भोकरे व मंगेश गुंड यांना त्यांचे गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, रवि रसाळ, रा, सदाशिव पेठ पुणे याच्याकडे गावठी पिस्टल असून तो पुणे येथील नदिपात्रात वर्तक बागेच्या मागील बाजूस आला आहे. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अश्विनी जगताप यांना सांगितली व त्यांनी मा. वरिष्ठांच्या परवानगीने अधिकारी व स्टाफ सदर ठिकाणी रवाना करून आरोपी (१) रविंद्र लक्ष्मण रसाळ, वय २१ वर्षे, रा. मु. चिरमोडी, पो. गुंजवणे, ता. वेल्हा जि पुणे (२) अथर्व अभिमन्यू शेजवळ, वय २० वर्षे, रा. शिवांश अपार्टमेंट, राम मंदिराजवळ गल्ली नं १, आंबेगाव पठार चिंतामणी शाळेजवळ, पुणे यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून ०१ पिस्टल व ०१ जिवंत काडतुस जप्त करून त्यांचेवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिरस्टर नंबर ४९८ / २०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यांना सदर मुद्देमालासह भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, मा. पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) मा. निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मा. विजय कुंभार, सहायक पोलीस आयुक्त १, गुन्हे शाखा, खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार सपोनिरी राजेश माळेगावे, पोउपनिरी रामेश्वर पार्वे, पोलीस हवालदार ६७८२ अमोल आवाड, ६७१४ दुर्योधन गुरव, १५८९ बालारफि शेख, ७५४२ रहिम शेख, ८८०२ मयुर भोकरे, ८८७८ मंगेश गुंड यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























