Homeक्राईमबेकायदेशिर मटका जुगार चालविणाऱ्या इसमास एक वर्षा करीता लोणीकाळभोर पोलीसांनी केले स्थानबध्द...

बेकायदेशिर मटका जुगार चालविणाऱ्या इसमास एक वर्षा करीता लोणीकाळभोर पोलीसांनी केले स्थानबध्द एम.पी.डी.ए. कायदा दुरूस्ती नंतर बेकायदेशिर मटका जुगार चालविणाऱ्या इसमावर पुणे शहरातील प्रथम कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे पुणे शहरातील जनतेचे रक्षण व्हावे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये याकरीता पुणे शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशिर मटका जुगार धंदे करणारे, अंमली पदार्थ विक्रीचे रॅकेट चालविणारे, पोलीस अभिलेखावरील टोळीतील गुंड, दरोडा, जबरी चोरी तसेच शरीर व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुध्द ठोस व परिणामकारक कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणेबाबतचे आदेश देण्यात आलेले होते.
त्यानुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील बेकायदेशिर मटका जुगार चालविणारा रेकॉर्डवरील सराईत इसम नामे तात्याराव महादेव ससाणे, वय ५० वर्षे रा. माळीमळा, मारुती मंदिराशेजारी, लोणीकाळभोर, ता.हवेली, जि. पुणे हा पोलीसांकडुन वेळोवेळी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईस न जुमानता सातत्याने बेकायदेशिर मटका जुगार चालवुन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधक असलेली कृत्ये करत होता. त्याचे या कृत्यामुळे गोर गरीब लोकांचे आर्थिक नुकसान होऊन संसार उध्दवस्त होण्यामुळे लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली होती.

त्यादरम्यान एम.पी. डी. ए. कायदयामध्ये दिनांक ०९ जुन २०२५ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार अनुक्रमांक ३४ अन्वयेचे दुरुस्तीनुसार परिमंडळ ५ मधील लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशिर मटका जुगार चालविणारा इसम नामे तात्याराव महादेव ससाणे यांचेविरुध्द लोणीकाळभोर पोलीस ठाणेचे मार्फतीने एम. पी. डी. ए. कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता मा. पोलीस आयुक्त सो यांनी त्यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारीत केले आहेत.
सदरची कारवाई एम.पी. डी. ए. कायदा दुरूस्ती झालेनंतर पुणे शहर आयुक्तालयातील परिमंडळ ५ मधील लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडून बेकायेदशीर मटका जुगार चालवून सार्वजनिक सुव्यवस्थेस व शांतता भंग करणाऱ्या इसमावर सर्व प्रथम करण्यात आली असुन यापुढेही अशाप्रकारे बेकायदेशीर धंदे करणारे इसमांवर एम. पी. डी. ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. डॉ.राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परि. ०५, पुणे शहर, मा. श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) स्मिता पाटील, पो.उप निरी उदय काळभोर, पोलीस हवालदार सुनिल नागलोत, तेज भोसले, पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे, दिपक सोनवणे, महिला पोलीस अंमलदार योगिता भोसुरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!