संपादक फिरोज खाटीक :-. 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! युनिट २ गुन्हे शाखा पुणे शहर !
दि.०६/१०/२०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट – २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असताना पोलीस अंमलदार शंकर कुंभार यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्वारगेट हडपसर रोडवर ओव्हरब्रिज जवळ इसम नामे धनंजय चंद्रकांत वाघ वय ४५ वर्ष रा.पुलाची वाडी पेट्रोल पंपाजवळ डेक्कन पुणे यांचेकडून ७०,००० रू. कि.ची अॅक्सिस स्कुटर क्रमांक एम एच १२/ ई पी / ३८६२ सह ताब्यात घेण्यात आले होते.
सदर इसमाकडे त्याचेकडे मिळून आलेल्या अॅक्सिस स्कुटर बाबत चौकशी केली असता त्याने सदर गाडी तो चोरी करुन वापर करत असलेबाबत कबुली दिली. सदर गाडीबाबत माहिती घेतली असता त्याबाबत पर्वती पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १३/२०१८ भा.द.वि.क. ३७९ अन्वये दाखल असलेबाबत माहिती मिळाली. सदर चोरी केलेली अॅक्सिस गाडी पंचनाम्याने जप्त करुन नमुद इसमास पर्वती पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे. अशा प्रकारे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे १, पुणे शहर,श्री.विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अंजुम बागवान, सहा. पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, सहा. पोलीस निरीक्षक रसाळ, पोलीस अंमलदार कुंभार, जाधव, मोकाशी,नेवसे,पवार,टकले, चव्हाण, सरडे, आबनावे, थोरात, भिलारे, शिंदे, तांबोळी, वगारे व महिला पोलीस अंमलदार ताम्हाणे या पथकाने केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























