Homeक्राईमस्वारगेट एस.टी.स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाया महिला चोरटयास स्वारगेट पोलीसांनी...

स्वारगेट एस.टी.स्टँन्ड परिसरातील प्रवाशांचे सोन्याचे दागीने चोरी करणाया महिला चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद .

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर !

स्वारगेट पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं २३५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) मधील फिर्यादी हे दि.०५/०९/२०२५ रोजी एसटी क्रमांक MH-40 N – 9340 फलटण ते पुणे प्रवास करण्यासाठी बसले त्यावेळी त्यांचे गळ्यातील सोन्यांचे गंठण तुटले. त्यांचे शेजारी बसलेल्या अनोळखी मुलीने व त्यांची भाची हि गाडीमध्ये पडलेले मणी गोळा करून दिले त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांचेकडील असलेले सोन्याचे दागिने हे त्यांचे छोटया पर्समध्ये ठेवून ते मोठ्या बॅगमध्ये ठेवले होते. बस ही स्वारगेट बस स्टॅण्डमध्ये आली असता त्या अनोळखी मुलीने फिर्यादी यांना “मणी खाली पडले आहेत का पहा” असे सांगून फिर्यादी सिटखाली पाहत असताना त्यावेळेचा फायदा घेवून फिर्यादी यांचे सोन्याचे दागिने असलेली छोटी पर्स चोरी केली होती. त्यावरुन वर नमुद गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील अनोळखी महिलेचा शोध घेणेकामी श्री. यशवंत निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना देवुन गुन्हा उघडकीस आणणेकामी आदेशित केले होते.
त्यावरुन तपास पथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व पोउपनिरी रविंद्र कस्पटे यांनी तपास पथकातील हर्षल शिंदे व सुजय पवार यांना स्वारगेट एसटी स्टॅन्डचे सीसीटिव्ही फुटेज पाहणेबाबत आदेश दिले. त्यावरुन हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली त्यावरुन एक तोंडाला स्कार्फ बांधलेली महिला घटनेच्या वेळी संशयास्पद दिसुन आली. सदर संशयित महिलेचे व्यवस्थित फुटेज मिळणेकामी हर्षल शिंदे व सुजय पवार यांनी वरिष्ठांचे परवानगीने फलटण, बारामती, कर्जत, राशीन, जामखेड, पाटोदा व बीड एसटी स्टॅन्ड याठिकाणांवरील जवळ-जवळ २०० ते ३०० सीसीटिव्ही फुटेज पाहुन सदर आरोपीचा व्यवस्थितीत वर्णनाचा फोटो प्राप्त केला. सदर फोटोमधील महिलेस फिर्यादी व साक्षीदार यांनी खात्रीने ओळखले.
तद्नंतर बातमीदारांना सदर फोटो मधील महिलेचा शोध घेणेकामी सांगितले असता दि.२०/०९/२०२५ रोजी सदर महिला ही करमाळा एसटी स्टॅन्ड येथे आली असल्याची बातमी मिळाल्याने लागलीच मा. वरिष्ठांचे परवानगीने करमाळा येथे जावुन महिला नामे अश्विनी अविनाश भोसले वय २७ वर्षे रा. गणगेवाडी माही जळगांव ता. कर्जत, जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले. सदर महिलेस तपासअंती अटक करुन तपासा दरम्यान दाखल गुन्ह्यातील एकुण २,३५,०००/- रुपये किंमतीचे २३.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तपासा दरम्यान जप्त करुन दाखल गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. राजेश बनसोडे साो, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. मिलींद मोहिते साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, पुणे शहर, मा. राहुल आवारे साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. यशवंत निकम, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे), स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो.हवा.अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, म.पो. हवा. स्मिता सिताप, पोलीस अंमलदार सुजय पवार, फिरोज शेख, रमेश चव्हाण, संग्राम केंद्रे, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, संदीप घुले, हनुमंत दुधे, म. पो/ अं जयश्री हंडाळ, रेश्मा साळुंखे व नोबिता देसाई यांनी एकत्र मिळुन केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!