Homeक्राईमतीन वर्षाच्या मुलाचे परप्रांतीय दांपत्यांकडुन अपहरण, लुधीयाना पंजाब मधुन मुलाची सुखरुप सुटका,...

तीन वर्षाच्या मुलाचे परप्रांतीय दांपत्यांकडुन अपहरण, लुधीयाना पंजाब मधुन मुलाची सुखरुप सुटका, रांजणगाव MIDC पोलीसांच्या तत्पर कारवाईला आले यश “

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! रांजणगाव एम.आय.डी.सी.पोलीस स्टेशन !

रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औद्योगीक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार कामानिमित्ताने वास्तव्यास आहेत. कारेगाव येथे कामानिमित्ताने सौ. काजल महेंद्र पडघाण मुळ रा.जुमडा,ता.जि.वाशिम या त्यांचा भाऊ प्रमोद पाटील व मुलगा कु. आयुष वय 3 वर्षे याच्यासह राहण्यास आहेत. त्यांचे बिल्डींगमध्येच परप्रांतीय दांपत्य सौ. पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव व तिचे पती अर्जुनकुमार यादव मुळ रा. लोआलगान, चौसा, बिहार हे मागील आठ-दहा महिन्यापासुन भाड्याने राहण्यास आहेत. सौ.काजल पडघाण व त्यांचा भाऊ हे कंपनीमध्ये कामाला जात असल्याने सौ.काजल या त्यांचा मुलगा कु. आयुष याला संभाळण्यासाठी शेजारी राहणा-या पुजादेवी यादव यांच्याकडे देवुन कामावर जात होत्या.
दि.12/09/2015 रोजी नेहमीप्रमाणे सौ. काजल पडघाण या त्यांच्या मुलाला पुजादेवी यादव यांच्याकडे संभाळण्यासाठी देवुन कामावर गेल्या होत्या. संध्याकाळी कामावरुन त्या व त्यांचा भाऊ प्रमोद पाटील हे कामावरुन आले असता त्यांना पुजादेवी यादव व त्यांचा पती अर्जुन यादव व त्यांचा मुलगा कु. आयुष हे घरी मिळुन आले नाही. त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल बंद लागत होते. त्यानंतर त्यांनी शेजारील लोकांच्या मदतीने त्यांचा मुलगा कु. आयुष, पुजादेवी यादव व तिचे पतीचा शोध घेतला पंरतु ते मिळुन आले नाही. तसेच ते मुलाला घेवुन परत येतील असे वाटल्याने त्यांची दोन दिवस वाट पाहिली. परंतु ते परत न आल्यामुळे सौ.काजल महेंद्र पडघाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनला सौ.पुजादेवी अर्जुन यादव व तिचा पती अर्जुन यादव यांचेविरुध्द कु. आयुष वय 3 वर्षे याचे अपहरण केले प्रकरणी दि.15/09/2025 रोजी गुन्हा दाखल करण्याता आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांनी सदरची बाब मा. पोलीस अधिक्षक सो. श्री. संदीप गिल्ल सो., मा. अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे सो. व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले सो. यांना सांगीतली असता त्यांनी आरोपीचा शोध घेवुन मुलाची सुखरुप ताब्यात घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी गोपनिय माहितीच्या व बिहार येथील स्थानिक पोलीसंच्या मदतीने माहिती घेतली असता सदर आरोपी हे बिहार येथे आले नसल्याचे सामजले. त्यानंतर तांत्रिक विश्लेषन व गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हयातील आरोपी पुजादेवी यादव व तिचा पती अर्जुन यादव हे पंजाब राज्यातील लुधीयाना येथे पोहचल्याचे निष्पन्न झाल्याने रांजणगाव पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात व सहा. फौज. दत्तात्रय शिंदे यांना तात्काळ पंजाब येथे रवाना करण्यात आले. तसेच पोलीस निरीक्षक श्री. महादेव वाघमोडे यांनी लुधीयाना येथील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार रामल, गुरमित सिंग यांना तपास पथकास मदत करणे बाबत विनंती केली. त्यानुसार स्थानिक पोलीसांचे मदतीने रांजणगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने आरोपी नामे 1) पुजादेवी उर्फ वनिता अर्जुन यादव वय 37 वर्षे, 2) अर्जुनकुमार वकीलकुमार यादव वय 36 वर्षे, दोन्ही रा. लोआलगान, चौसा, मधेपुरा, बिहार यांना शिताफिने ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातुन अपहरीत मुलगा कु. आयुष महेंद्र पडघाण वय 03 वर्षे याची सुखरुप सुटका केली आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांना दि. 17/09/2025 रोजी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात तपास पथकाने अपहरीत मुलासह हजर केले असुन गुन्हयातील दोन्ही आरोपींना योग्य ती कायदेशीर कारवाई करुन सकाळी 08.48 वा. अटक करण्यात आलेली आहे. अटक आरोपींना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरुर कोर्टात हजर करुन पोलीस कस्टडी घेवुन पुढील तपास करण्यात येत आहे. आरोपींकडे तपास केला असता त्यांना सदर लहान बालकाचा लळा लागल्याने व त्यांना मुलबाळ होत नसल्यामुळे त्यांनी सदर बालकास पळवुन नेले असल्याचे सांगीतले आहे. अपहरीत मुलगा कु. आयुष यास त्याची आई सौ. काजल महेंद्र पडघाण यांचे ताब्यात देण्यात आले असुन मुलाचे भेटीने आई काजल यांना आनंद आश्रु अनावर झाले असुन मुलाची आई, नातेवाईक व शेजारी राहणारे सर्व ग्रामस्थ यांनी पोलीसांचे तत्पर्ते बद्दल अभिनंदन केले आहे.
सदरची कामगीरी मा. संदीप गिल्ल सो. पोलीस अधिक्षक सो. पुणे ग्रा, मा. रमेश चोपडे सो. अप्पर पोलीस अधिक्षक पुणे, श्री. प्रशांत ढोले सो. उपविभागीय पो. अधिकारी शिरुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहा. फौज. दत्तात्रय शिंदे, पो.काँ. उमेश कुतवळ, विजय सरजिने, सायबर पोलीस स्टेशनचे पो.काँ. संकेत जाधव, पंजाब लुधीयाना येथील पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राम काऊंटर एंटेलिजेन्स), गुरमित सिंग (देरसी पोलीस स्टेशन) व त्यांचे पोलीस स्टेशन कडील पोलीस स्टाफ यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. अशोक चव्हाण रांजणगाव MIDC पो.स्टे. हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!