संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! नांदेड सिटी पोलीस स्टेशन पुणे शहर !
दि. ०४/०८/२०२५ रोजी सायंकाळी कोल्हेवाडी येथे गाडी घासल्याच्या कारणांवरुन हवेत ३ गोळी फायर करुन आरोपी फरार झाले होते. मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अतुल भोस यांनी तात्काळ गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे बाबत आदेशीत केले होते. सदर घटनेची माहीती घेत असताना व आरोपींचा शोध घेत असताना पोशि/ १०२१५ स्वप्नील मगर, पोशि/ ९१५६ बंटी मोरे, पो.हवा. ८१२२ संग्राम शिनगारे यांना त्यांचे गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदर ठिकाणी फायरींग करणारे आरोपी हे खडकवासला चौपाटी येथे थांबलेले आहेत वगैरे मजकुरची बातमी मिळाल्याने सदरची बातमी मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक, अतुल भोस यांना कळविली असता त्यांनी त्यांना ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. त्यानंतर सपोनि राहुल यादव, तसेच पोहवा / ८१२२ शिनगारे, पोना / ५७९१ वेगरे, पोशि/ १०२१५ मगर व पोशि/९१५६ मोरे, पोशि/९१९१ क्षिरसागर, पोशि/१०१२६ गांगुर्डे, पोशि/ ८९३३ मिसाळ, पोशि/८६९४ कुलथे, पोशि/१०७५० जाधव असे बातमीच्या ठिकाणी खात्री करता बातमीतीचे वर्णनाप्रमाणे सहा इसम संशयितरित्या थांबलेले दिसल्याने त्यांना ताब्यात घेतले असुन त्यांचेवर नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु. रजि. नं. १५९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), १८९(२),१८९ (४), १९०, १९१(२),३५१(२) (३), ३५२ सह आर्म अॅक्ट कलम ३,२५,२७ तसेच क्रिमिनल ॲमेंटमेंट कलम ७ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१), १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
आरोपी नामे १) साहिल आरविंद चव्हाण वय २४ वर्षे रा. सप्तगिरी हाईट्स खडकवासला पुणे, २) अभिजीत राजु चव्हाण वय – ३१ वर्षे रा. तिरुमल हाईट्स कोल्हेवाडी पुणे, ३) प्रशांत यशवंत चव्हाण वय – ३४ वर्षे रा.सप्तगिरी हाईट्स लमाणवाडी खडकवासला पुणे, ४) आकाश भिमा चव्हाण वय २४ वर्षे रा. तिरुमल हाईट्स खडकवासला पुणे, ५) गितेश शंकरजाधव वय २० वर्षे रा. नानाजी व्हिलाच्या पाठीमागे खडकवासला पुणे, ६) मंदार यशवंत चव्हण वय – ३९ वर्षे, रा. सप्तगिरी हाईट्स लमाणवाडी खडकवासला पुणे यांना अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सोो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सोो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, प्रविण जाधव, पो.उप.निरीक्षक कसबे पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत, निलेश खांबे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























