संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर
काळेपडळ पो.स्टे. गु.रजि.नं. १५३/२०२५ बी. एन. एस. कलम ३०६ प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम सलमान यासीन पठाण, वय ३२ वर्षे, रा. रुम नं. ३०५, ईसा हाईट्स, दोस्ती बिल्डींजवळ, खान कंपाऊंड, शिळफाटा, डावेगाव, ठाणे मुळ गाव – पाली, जि.बीड हा फिर्यादी यांचेकडे चालक म्हणुन नोकरीला असताना, त्याने मालकाकडील मजुरांना पगारासाठी आणलेले पैसे गाडीतुनच चोरी करुन घेवुन गेला होता. सदर आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासुन परागंदा होता. आरोपीने त्याचे मोबाईल फोन बंद करुन ठेवले होते. आरोपी सदर काळामध्ये मिरज-सांगली, बीड, पुणे ग्रामीण, मुंबई, मुंब्रा, ठाणे परिसरामध्ये त्याचे अस्तित्व लपवुन फिरत होता. त्याचा शोध घेत असताना वरील ठिकाणांवर गेलो असता आरोपी तेथुन पसार व्हायचा. गुन्हा दाखल झाल्यापासुन आरोपीचा मोबाईल फोन, मोबाईल क्रमांक हे ट्रेसिंगवर ठेवले होते. परंतु आरोपी स्वतःचा मोबाईल न वापरता रस्त्यावरील अनोळखी इसम, रिक्षाचालक, कॅब चालक, हॉटेल वेटर व इतर लोकांकडुन तात्पुरता मोबाईल फोन घेवुन त्याचे नातेवाईकांना संपर्क करीत होता. त्यामुळे सदर मोबाईलचा माग काढल्यास आरोपी मिळुन येत नव्हता. दरम्यान आरोपीने त्याचा सुरुवातीचे मोबाईल नंबरवरुन त्याचे नातेवाईकांना एक फोन कॉल केला व त्या एका फोनचा धागा पकडुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलीस हवालदार प्रतिक लाहिगुडे यांनी सदर आरोपीचे लोकेशन काढले. त्याअनुशंगाने तपास पथकाचे अधिकारी सपोनि अमित शेटे, पोहवा. दाऊद सय्यद, पोलीस अंमलदार शाहिद शेख व प्रदिप बेडीस्कर यांनी सदर आरोपीस सापळा रचुन शिळडायघर पोलीस ठाणे मुंब्रा, ठाणे येथुन आरोपीच्याच मित्राच्या मदतीने आरोपीस शिताफतीने ताब्यात घेवुन त्याचेकडुन दाखल गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी एकुण १५,०६,४२०-००/- रु. किंमतीचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चार चाकी गाडी व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,काळेपडळ पोलीस स्टेशन, यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पो.अं. श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























