Homeक्राईम१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारा अज्ञात इसम निघाला इंजिनिअरिंगचा टॉपर विश्रामबाग...

१ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणारा अज्ञात इसम निघाला इंजिनिअरिंगचा टॉपर विश्रामबाग तपास पथकाने जिल्हा कोलार राज्य कर्नाटक येथुन घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर 

विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं १६० / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ ( अ ), ३३१(४) अन्वये दाखल गुन्हयात यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०६/०७/२०२५ रोजी रात्री १२.५० वा. सु. ते ०१.२० वा. सु. चे दरम्यान फिर्यादी यांचे आर.जे. ज्वेलर्स, १३१४, बुधवार पेठ, बाजीराव रोड, नु.म.वि. शाळेशेजारी, पुणे- ०२ असे १ ग्रॅम ज्वेलरी (फॉर्मिंग ज्वेलरी) चे दुकानात एक अनोळखी व्यक्ती अंगाने सडपातळ अंदाजे वय २० ते २५ वर्षाचे दरम्यान, दाट कुरळे केस असलेला, तोंडावर काळा मास्क, पांढ-या रंगाचा हाफ बाह्यांचा टि – शर्ट व जिन्स पॅन्ट परिधान केलेला, पाठीवर सॅक असलेला याने फिर्यादी यांच्या दुकानाचे दुस-या मजल्यावरील वॉशरुमचे खिडकीतुन फिर्यादी यांच्या परवानगी शिवाय प्रवेश करुन लबाडीचे उद्देशाने फिर्यादी यांच्या दुकानातील एकुण किं.अं. ४,७४,०००/- रुपये किमतीचा एक ग्रॅम सोन्याची (फॉर्मिंग ज्वेलरी) चा माल चोरुन नेला फिर्यादी यांनी त्या अनोळखी व्यक्ती विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेश उसगावकर, सहायक पोलीस निरीक्षक व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग तपास पथकाने तांत्रीक विश्वलेषन व २३० ते २५० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन संशयीत हा जंगमगुर्जनहल्ली, पो. अरनहल्ली ता. जि. कोलार राज्य कर्नाटक येथील असल्याचे स्पष्ट झाल्याने संशयीत इसमास ताब्यात घेण्याकामी विश्रामबाग पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व पोअं/ ८२९२ अशिष खरात, पोअं/ ८६९१ राहुल मोरे, पोअं/ ९८२० अनिस शेख, पोअं/ १००१६ शिवदत्त गायकवाड असे मिळुन कोलार जिल्हयात जावुन लोकल पोलीस ठाण्याची मदत घेवुन अज्ञात इसमाच्या राहते घरी जावुन शोध घेतला असता संशयीत इसम मिळुन न आल्याने त्याच्या राहत्या घरची घरझडती पंचासमक्ष घेतली असता चोरी करणार संशयीत इसम यांने पायात परिधान केलेला सॅण्डल, बॅग (सॅक) तसेच इंजिनिअरिंगचे कॉलेजचे आयकार्ड, व मोबाईल मिळुन आल्याने सदर मोबाईल चेक केला असता मोबाईल मध्ये १ ग्रॅम सोन्याचे फोटो व आरोपीच्या हाताच्या जखमेचे फोटो मिळुन आल्याने व सदरच्या वस्तु सीसीटीव्ही मधील हुबेहुब दिसुन आल्याने सदरचा गुन्हा आरोपी नामे लिखीत जी वय १९ वर्षे रा. जंगमगुर्जनहल्ली, पो. अरनहल्ली ता. जि. कोलार राज्य कर्नाटक याने केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी मिळुन न आल्याने ४ दिवस आरोपी ज्या ज्या ठिकाणी येतो त्या त्या ठिकाणी लोकल पोलीसांची मदत घेऊन ट्रॅप लावुन आरोपीस गांधीनगर, कोलार, राज्य कर्नाटक येथुन ताब्यात घेवुन संशयाताकडुन गुन्हयातील गेला माल १ ग्रॅम सोन्याचे वेगवेगळे दागिन्यांची किंमत ४,७४,०००/- रुपायांचा शंभर टक्के मुद्देमाल कौशल्य पुर्ण तपास करुन हस्तगत करण्यात आला असुन संशयीत आरोपीतास दिनांक १६/०७/२०२५ रोजी मा. न्यायालया समोर हजर केले असता त्यांनी दिनांक १९/०७/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली असुन सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय बनसोडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच राजेश उसगावकर, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार सचिन कदम, गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे व प्रशांत कदम यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!