Homeक्राईमसिंहगडरोड पोलीस स्टेशन येथिल जबरी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्हयातील ०३ आरोपी व...

सिंहगडरोड पोलीस स्टेशन येथिल जबरी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्हयातील ०३ आरोपी व एक विधीसंघर्षीत बालक मुद्देमालासह ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  *

युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर

दि.०१/०७/२०२५ रोजी गजानन ज्वेलर्स, रेणुकानगरी, वडगाव बु. पुणे या सराफ दुकानामध्ये अनोळखी चोरटयांनी प्रवेश करुन, दुकानदार महिला फिर्यादी यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देश्याने त्यांच्या डोक्यात व डावे हाताचे दंडावर लोखंडी हत्याराने वार करुन, त्यांना गंभीर जखमी करुन, दुकानाचे कपाटाचे काचा लोखंडी हत्याराने फोडुन, कपाटामधील किंमत रुपये ४,५०,०००/-रू.किं.चे ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरुन नेले व पळुन जातेवेळी त्यांचे हातामधील पिस्तोल व लोखंडी हत्यार हवेत फिरवत लोकांमध्ये दहशत निर्माण करीत निघुन गेले. सदर घटनेबाबत फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ३२९/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३११,३ (५), सह भारतीय हत्यार कायदा कलम ३,४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ क्रिमीनल लॉ अमेंडमेन्ट कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेनंतर तात्काळ गुन्हे शाखा, पुणे शहर कडील युनिट १, २,३ तसेच खंडणी विरोधी पथक व दरोडा वाहन चोरी विरोधी पथक यांनी घटनास्थळास भेटी देवुन संमातर तपास सुरु केला. तपासा दरम्यान गुन्हे शाखा युनिट ०३ व नांदेड सिटी डिबी पथक यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करुन आरोपीतांची ओळख पटवुन आरोपी निष्पन्न करुन नमुद गुन्हयातील विधीसंघर्षित बालकास ताब्यात घेतले. त्याच्याकडुन गुन्हयात वापरलेले वाहन शाईन कंपनीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे व त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हयातील पाहिजे आरोपी बाबत माहिती काढुन गुन्हे शाखा युनिट ०३ चे पथक व सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे पथक हे अहमदनगर या ठिकाणी रवाना करुन गुन्हयातील उर्वरित ०३ आरोपी नामे १) वरदन संजय खरटमल वय २० वर्ष रा शांताईनगर पठार वस्ती, कुदळेचाळ, वडगाव बा. पुणे २) अमर हनुमंत बाभळे वय २० वर्ष रा आशाताई निवास समोर, उत्कर्ष शाळेच्या पाठीमागे, धबाडी, वडगाव बा, पुणे ३) ओकांर रवि शिंदे वय २२ वर्ष रा. मानाजीनगर, विघ्नहर्ता हाईटस, प्लॅट नंबर २, न-हे, पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करुन नमुद गुन्हयातील चोरीस गेलेला खालिल वर्णनाचा मुद्देमाल त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेला आहे. १)१,३५,०००/- रुपये किमंतीची ०१ सोन्याची चैन वजन अंदाजे १५ ग्रॅम डिझाईन असलेली २) ९०,०००/- रुपये किमंतीची ०१ सोन्याची चैन वजन अंदाजे १० ग्रॅम ३)१,३५,०००/- रुपये किमंतीची ०३ सोन्याची चैन प्रत्येकी वजन ०५ ग्रॅम ४) ९०,०००/- रुपये किमंतीची ०१ नेकलेस वजन अंदाजे १० ग्रॅम
असा एकुण ४,५०,०००/- रू. किं.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी ही, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा (अति. कार्य. गुन्हे शाखा), पुणे शहर श्री. विवेक मासाळ, पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ – ०३, पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १ श्री. गणेश इंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे शहर श्री. अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ३, चे पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब पाटील, खंडणी विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक श्री. संखे, नांदेड सिटी पो स्टे, पोलीस निरीक्षक श्री. भोस, सिंहगड रोड पो स्टे, पोलीस निरीक्षक श्री. दायंगडे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, प्रविण काळुखे, सचिन यादव, पोलीस उप-निरीक्षक फरताडे, भांडवलकर, सपोफौ पंढरीनाथ शिंदे, पोलीस अंमलदार कैलास लिम्हण, किशोर शिंदे, अतुल साठे, तुपसौंदर, शनगारे, बोडरे, ताजणे, वेगरे, पुरषोत्तम गुल्ला, तुषार किंद्रे, स्वप्निल मगर, कारके, मोहिते, झगडे, चव्हाण, माळवदकर, मोरे, क्षीरसागर यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!