Homeक्राईमऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयातील फसवणूकीच्या रक्कमा ट्रान्सफर करण्याकरीता बँक खाती, सिमकार्ड उपलब्ध...

ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयातील फसवणूकीच्या रक्कमा ट्रान्सफर करण्याकरीता बँक खाती, सिमकार्ड उपलब्ध करुन देणा-या आंतरराष्ट्रीय टोळीच्या सदस्यांना अटक करुन त्यांचे नेटवर्कची साखळी केली उध्वस्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेला गुरनं ४५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८ (४),३१६ (५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड) या गुन्हयातील फिर्यादी यांना “TRASHOONYA” या कंपनीचे मार्फतीने ऑनलाईन शेअर ट्रेडिंग केल्यास त्यांना मोठया प्रमाणात फायदा होईल असे आमिष सदर कंपनीचे एजंट नामे दिव्यांशी अग्रवाल, अशोक रेड्डी यांनी दाखवून सदर गुन्हयातील आरोपीतांनी रेग्यूलर कॉल व्दारे तसेच वॉट्सअप चॅटव्दारे संपर्क साधून त्यांना त्यांचे व्हॉटसअॅप मेसेज द्वारे दिलेल्या लिंक वर क्लिक करून त्यांचे “TRASHOONYA” या नावाचे अॅप त्यांचे मोबाईल मध्ये डाऊनलोड करावयास लावून विविध कंपन्यांचे शेअर्स व आयपीओ खरेदी करण्याचे बहाण्याने फिर्यादी यांची एकूण ६०,२०,०००/- रू.ची फसवणूक केली म्हणून दिनांक १९/०४/२०२५ रोजी सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासात फिर्यादी यांच्या एकूण फसवणूकीच्या रक्कमेपैकी १४,३०,०००/- रू.रक्कम ही ए यू स्मॉल फायनान्स बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर झाली होती. सदरचे खाते हे आदियोगी स्क्रॅप अँड वेस्ट मॅनेजमेन्ट एलएलपी, शिवणे पुणे येथील असल्याने सदर कंपनीचा डायरेक्टर नामे अनिकेत प्रशांत भाडळे वय २७ वर्षे रा. शिवाजीनगर गावठाण, पुणे यास ताब्यात घेवून त्यास सदर गुन्हयात दि. २२/०६/२०२५ रोजी अटक करण्यात आली. त्याचेकडे तपासा दरम्यान त्याचे सदरचे बँक खाते सिंहगड रोड येथील ऑफीस मधून आकाश हा वापरत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर सदर गुन्ह्याचा सखोल तपास करीत असताना काही नेपाळी इसम नन्हे येथे हॉटेल मध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस पथकाने त्यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात तपास केला असता त्यांची नावे १) नोरबु शेर्पा, वय २८ वर्षे, रा. गांव टॅप्टींग, जिल्हा सोलुंखुबू, नेपाळ २) अंग नुरी शेर्पा, वय २१ वर्षे, रा. जिल्हा ओखलडुंगा, गांव खिजीदेम्बा,नेपाळ. तसेच ३) सागर मच्छिंद्र गायकवाड वय २६ वर्षे रा. गणेशमळा सिंहगडरोड, पुणे ४) शिवतेज अशोकराव गुंजकर वय ३३ वर्षे रा. जांभुळवाडी आंबेगाव, पुणे. सदर इसमांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये आत्ता पर्यत १० मोबाईल फोन, १० पेन ड्राईव्ह, ०१ बँकेचे स्वाईप मशिन, ०४ लॅपटॉप, ५३ विविध बँकांचे डेबीट कार्ड, १७४ विविध कंपन्यांचे सिमकार्ड, ५५ विविध बँकांचे चेकबूक, ०१ सीपीयू, ३९ विविध कंपन्यांचे शिक्के, ०२ राऊटर, २७ विविध बँकांचे मोकळे चेक, ०४ हार्ड डिस्क, ०७ सीडी/डीव्हीडी, २७ नग क्यूआर कोड व ०१ डीव्हीआर असे साहित्य जप्त

सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप-आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, पुणे शहर श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे, श्री. मच्छींद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर श्रीमती स्वप्नाली शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्रीमती संगिता देवकाते, सपोफौ. संदेश कर्णे, पोलीस अंमलदार प्रविणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, जान्हवी भडेकर, प्रशांत बो-हाडे, बाळासो चव्हाण, नवनाथ कोंढे, सचिन शिंदे, अनिकेत भिंगारे, आदनान शेख, श्रीकृष्ण नागटिळक, अमोल कदम, संदिप पवार, सतीशकुमार मांढरे, संदिप मुंढे, संदिप यादव, कौशल्या भांगिरे, निलम नाईकरे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!