Homeक्राईमसराफांनी कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक; ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.

सराफांनी कारागिराची केली २७ लाखांची फसवणूक; ३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

फरासखाना पोलीस स्टेशन 

पुणे – सोने घेऊन पळ काढणाऱ्या कारागिराच्या घटना नेहमी ऐकिवात येतात, मात्र यावेळी उलट प्रकार घडला आहे. स्वतःचे सोने वापरून कारागिराने तयार केलेले ११३३ ग्रॅमचे दागिने सराफांनी घेऊन टाकले; तसेच २७ लाखांचे सोने परत न करता त्याची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात अमर पाचू माजी (वय ५२, रा. गुरुवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून राजाराम मोरे, मनोज मोरे (रा. आंगणवाडी, मोरे सव्ती, चिखली), आणि विकास इंगळे (रा. तपकीर गल्ली, बुधवार पेठ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ८ ऑगस्ट २०२४ पासून सुरू असून अद्याप सोन्याची परतफेड न झाल्यामुळे आता कायदेशीर कारवाईचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे.

फिर्यादी माजी हे “अमर माजी गोल्ड स्मिथ” या नावाने बुधवार पेठेत दागिने बनविण्याचा व्यवसाय करतात. ते विविध सराफ व्यावसायिकांच्या ऑर्डरप्रमाणे दागिने तयार करतात. आरोपी विकास इंगळे हा त्यांचा जुना ओळखीचा असून तो १६ जुलै २०२४ रोजी राजाराम व मनोज मोरे यांना दुकानात घेऊन आला. “पूजा ज्वेलर्स” नावाने व्यवसाय करीत असल्याचे सांगत त्यांनी जवळपास ३ किलो सोन्याच्या भांडवलाचा दावा केला. त्यांनी ६७६ ग्रॅम फाईन सोने माजी यांच्याकडे दिले आणि आवश्यक असल्यास स्वतःचे सोने टाकून दागिने बनविण्याची परवानगी दिली. माजी यांनी ११३३ ग्रॅमचे दागिने तयार केले. त्यात पेंडल, मंगळसूत्र वाटी, कानचैन, अंगठ्या अशा प्रकारांचा समावेश होता.

८ ऑगस्ट रोजी तिघांनी दुकानात येऊन दागिने घेतले आणि लवकरच २७.६२ लाखांचे ४०६ ग्रॅम सोने परत करतो असे आश्वासन दिले. मात्र त्यानंतर अनेक वेळा मागणी करूनही त्यांनी सोने परत केले नाही. त्यामुळे शेवटी माजी यांनी पोलिसांकडे धाव घेतली. फरासखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!