Homeक्राईमपिटासह मोका गुन्हयामध्ये शिक्षा भोगलेली गांजा विक्रीचे रॅकेट मधील पाहिजे आरोपी मास्टरमाइंड...

पिटासह मोका गुन्हयामध्ये शिक्षा भोगलेली गांजा विक्रीचे रॅकेट मधील पाहिजे आरोपी मास्टरमाइंड कल्याणी देशपांडे हिला आंध्रप्रदेश मधुन अटक,अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांची कामगिरी,

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे, पिंपरी चिंचवड पुणे शहर

मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले आहे.
दि २४/०५/२०२५ रोजी वपोनि संतोष पाटील, सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे बावधन येथील पाषाण सुस रोडवर पेट्रोलींग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पाषाण सुस रोडवरील कल्याणी उर्फ जयश्री देशपांडे हिचे कल्याणी कलेक्शन नावाचे दुकानामध्ये व राहते घरामध्ये तीचे साथीदारांसह गांजाची विक्री करीत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीवरुन छापा टाकुन इसम नामे १. उमेश सुर्यकांत देशपांडे, वय ५६ वर्षे, रा शिवालय सोसायटी, पल्लवी अपार्टमेंट, फ्लॅट क्र ७, पाषाण सुस रोड, पुणे, २. अभिषेक विकास रानवडे, वय ३२ वर्षे, सध्या रा बालाजी निवास, हनुमान मंदिराचे बाजुला, पाषाण सुस रोड, पुणे मुळ रा ६२०/२१ अष्टभुजा दुर्गादेवी मंदिराचे जवळ, दुधाळवाडा, शनिवार पेठ, पुणे, ३. महिला नामे ऐश्वर्या अभिषेक रानवडे/ऐश्वर्या निलेश देशपांडे, वय २२ वर्षे, रा सदर यांचे ताब्यातुन एकुण ११,२७,७००/- रुपये किंमतीचा २० किलो ७३६ ग्रम गांजा हा अंमली पदार्थ, ०३ मोबाईल व ७०० /- रुपये रोख रक्कम असा माल जप्त करुन त्यांचे विरुध्द बावधन पोलीस स्टेशन गु.र.क्र. २१३/२०२५ एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील मुख्य आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हि गुन्हा दाखल झालेपासुन ती पुण्यातुन परागंदा झाली होती.
अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी पाहिजे आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिचा शोध घेणेकामी सपोनि विक्रम गायकवाड यांचे नेतृत्वात एक पथक नेमले होते. सदर पथकाने स्थानिक बातमीदारांचे मदतीने माहिती घेवुन व तांत्रिक विश्लेषण वरुन आरोपी नामे कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हि आंध्रप्रदेशामध्ये असल्याची माहिती प्राप्त केली. त्यानुसार लागलीच तपास पथक आंध्रप्रदेशातील ईस्ट गोदावरी जिल्हयातील राजनगरम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येथे जावुन सापळा लावुन सदर महिलेस ताब्यात घेवुन तिला अटक करण्यात आली आहे. आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिस दाखल गुन्हयाचे पुढील तपासकामी बावधन पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे हिचेवर यापुर्वी पुढील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
हवेली पोलीस स्टेशन ०१/२००५ भारतीय दंड विधान ३०२
डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३०३५/२००७ भारतीय दंड विधान ४५७
१)
२)
३)
चतःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३९३/२००७ भारतीय दंड विधान ३४४, ३६६, ४३८
४)
चतःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३३००/२००८ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४
५)
६)
चतःश्रृंगी पोलीस स्टेशन गु.र.क्र. १०१/२०१३ भारतीय दंड विधान ४२०, ४३८ व पिटा अॅक्ट डेक्कन पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३०२६/२०१३ पिटा अॅक्ट ३, ४, ५, ७
कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. २६८/२०१६ पिटा अॅक्ट ३, ४, ५, ७
८)
कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३४७/२०१६ पिटा अॅक्ट ३, ४, ५, ७ व मोका
सदरची कारवाई मा. विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त, मा.संदिप डोईफोडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहा पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड पोलीस अंमलदार जावेद बागसिराज, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, गणेश कर्पे यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!