संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
दिनांक २९/०५/२०२५ रोजी ०८.०० वा. चे सुमारास गार्गी एंटरप्रायजेसचे समोर मांजरी बुद्रुक पुणे येथे सुमित खवळे, वैभव गवळी, व इतर अनोळखी चार मुलांनी बेकायदेशीर जमाव जमवुन तसेच बेकायदेशीर लोखंडी हत्यार व पिसटल जवळ बाळगुन सुमित खवळे याने फिर्यादी यांचा मुलगा स्वप्नील ऊर्फ बिटया यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे दिशेने बंदुकीतून गोळी झाडुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तसेच वैभव गवळी हा लोखंडी हत्यार घेवून स्वप्नील ऊर्फ बिटया याचे मागे जीवे ठार मारण्याच्या उददेशाने लागला होता. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५०९/२०२५, भा. न्या. सं. का. कलम १०९, १८९ (२), (४),१९०,१९१(२) (३) भा. हत्यार का. कलम – ३ (२५), ४(२५), क्रिमीनल लॉ अॅमेंडमेंट का. कलम ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा. मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे साो. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व श्री. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक आणि अंमलदार अविनाश गोसावी, अमित साखरे, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, बापु लोणकर, यांचे पथक आणि सत्यवान गेंड, पोलीस उप निरीक्षक तसेच अंमलदार तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, लखन दांडगे अशी दोन पथके तयार केली. नमुद पथकाने मिळालेल्या माहीती आधारे १) विलास दत्ता खवळे वय २० वर्ष रा. बॅक ऑफ बडोदाच्यामागे, सासवड रोड, सातववाडी, हडपसर, पुणे, २) साहिल बाबुराव जगताप वय २० वर्ष रा. जाईमंगल कार्यालयाच्यासमोर, अशोका बारच्यामागे, घवाटे वस्ती, मांजरी, पुणे, ३) बसवराज विजय सुतार, वय २४ वर्ष केशवनगर ग्रामपंचायतजवळ, पोटे कम्पुटरजवळ, मुंढवा, पुणे ४) वैभव श्रावण गवळी वय २२ वर्ष रा केशवनगर मुढवा पुणे. यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे केले तपासात त्यांनी दाखल गुन्हा केल्याचे सांगून गुन्ह्याकरीता लागणारे अग्निशस्त्र हे शिरूर येथील इसमाकडून घेतले असल्याचे सांगीतल्याने तपास पथकाने शिरूर भागात जावून ५) सचिन गंगाराम रेनके वय ३५ वर्ष रा. गादीया पेट्रोलपंपाच्यामागे, इंदीरा नगर शिरूर यास ताब्यात घेतले.
आरोपींकडून त्यांनी गुन्हा करताना वापर केलेले गावठी बनावटीचे पिस्टल हे हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींकडे केले तपासात आपआपसातील वादातुन दाखल गुन्हा केला असल्याचे सांगीतले आहे. अधिक तपास पोलीस उप निरीक्षक अनिल बिनवडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि.(गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे…

मुख्य संपादक : – इमरान शेख


























