संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो., मा. सह पोलीस आयुक्त, श्री शशिकांत महावरकर साो, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड सो यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदा अग्नीशस्त्राची तस्करी करणारे तसेच जवळ बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांबाबत माहिती प्राप्त करुन कार्यवाही करणेबाबत आदेश दिले होते. त्याअनुशंगाने मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री संदीप डोईफोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री विशाल हिरे यांनी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांना त्याबाबत सुचना व मार्गदर्शन केले होते
त्याअनुशंगाने मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिं चिं. कडील अधिकारी व अंमलदार हे गोपनिय बातमी प्राप्त करीत असताना पोलीस शिपाई २६४३ गणेश सावंत, पोलीस शिपाई २६७३ सुमित देवकर व पोलीस शिपाई २९४७ विनोद वीर यांना बातमी मिळाली की, तळेगाव दाभाडे दाभाडे परिसरामध्ये “ तीन इसम हे नंबरप्लेट नसलेल्या ग्रे रंगाच्या मारुती सुझुकी कंपनीच्या सियाज गाडीमध्ये तळेगाव दाभाडे परिसरात फिरत आहे व त्याचे जवळ पिस्टल आहे.” त्याअनुशंगाने मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाकचे मा.व.पो.नि. विजय ढमाळ, पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे, गणेश सावंत, सुमित देवकर, हर्षद कदम, विनोद वीर व गणेश हिंगे अश्यापथकाने तळेगाव दाभाडे परिसरातील जुना पुणे मुंबई हायवे येथे नंबरप्लेट नसणाऱ्या मारुती सुझुकी सियाज कारमधुन फिरत असताना तीन इसमांना ताब्यात घेतले. त्यांची नावे १) उमेश चंद्रकांत २८ वर्षे, रा पुनावळे, ता मुळशी, जि पुणे. २) मंथन उर्फ गुड्डु अशोक सातकर, २८ वर्षे, रा कान्हे, ता मावळ, जि पुणे. ३) विशाल ज्योतीराम खानेकर, वय मोहितेवाडी, ता मावळ, जि पुणे अशी आहे. नमुद इसमांकडुन ८,७६,००० /- रु किंमतीचे ०५ देशी बनावटीचे पिस्टल, २० जिवंत काडतुसे (राऊंण्ड), दोन मोकळया मॅग्जीन, तीन मोबाईल फोन व मारुती सुझुकी सियाज गाडी ही जप्त करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड येथे गुन्हा रजिस्टर नंबर ११८/२०२७ भारतीय हत्यार कायदा कलम ३, ७, २५ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्यांस अटक करण्यात आलेली आहे. नमुद आरोपींकडे केलेल्या तपासावरुन त्यांनी एवढया मोठया प्रमाणत अग्नीशस्त्र साठा हा अवैधरित्या दहशत माजविणेकरीता व विक्रीकरीता बाळगले असल्याचे प्राथमिक तपासामध्ये दिसुन येत आहे. नमुद आरोपी यांना दि. ०४/०६/२०२७ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली असुन पुढील तपास हा मालमत्ता गुन्हे विरोधी पथक, गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड हे करीत आहे.
आरोपी उमेश केदारी यांचेविरुध्द यापुर्वी खुनाच्या गुन्हयासहीत एकुण ४ गुन्हे दाखल आहे. आरोपी मंथन सातकर याचेविरुध्द खुनाच्या प्रत्यत्नासह एकुण ३ गुन्हे दाखल आहे. तसेच आरोपी विशाल खानेकर याचेविरुध्द शरीराविरुध्दचे एकुण २ गुन्हे दाखल
आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साो., मा. सह पोलीस आयुक्त, श्री शशिकांत महावरकर, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री संदीप डोईफोडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, श्री विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार सोमनाथ मोरे, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, हर्षद कदम, गणेश हिंगे यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























