Homeक्राईमभारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थीतीत कोंढवा तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी रेकॉर्डवरील सराईत आरोपीकडून...

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थीतीत कोंढवा तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी रेकॉर्डवरील सराईत आरोपीकडून ०१ गावठी कट्टा, ०१ गावठी पिस्टल, व ०३ जिवंत काडतूसे केली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

दि. ०९/०५/२०२५ रोजी भारत-पाकिस्तान या दोन देशामध्ये चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थीतीच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करणेकामी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोहवा/ ६९५१ विशाल मेमाणे, पोहवा / ७९ निलेश देसाई, पोहवा / ८४८६ गोरखनाथ चिनके, पो.अं./८५९१ लक्ष्मण होळकर, पो.अं. / २१८५ सुजित मदन, पो. अं./९८३८ संतोष बनसुडे व पो.अं./१०२३२ सैफ पठाण असे कोंढवा पोस्टे हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था, अवैध धंद्यांवर कारवाई करणे, पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी चेक करणे, पाहिजे फरारी आरोपी चेक करणे, तडीपार आरोपी चेक करणे तसेच संशयीत अरोपी चेक करणेकामी पेट्रोलिंग करीत असताना पोहवा / ११६१ सतिश चव्हाण व पोहवा/६९५१ विशाल मेमाणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एक इसम देशी बनावटीचे पिस्टल व काही काडतुसे घेवून विक्री करीता शांतीबन सोसायटीचे बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत, कोंढवा बु., पुणे येथे थांबलेला असून त्याने निळ्या रंगाची जीन्स पँट व हिरवट रंगाचा शर्ट घातलेला आहे.” अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहा. पोलीस

निरीक्षक राकेश जाधव, यांनी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विनय पाटणकर यांना कळविली असता त्यांनी योग्यत्या सुचना देवून कायदेशिर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या.

त्या अनुषंगाने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांनी शांतीबन सोसायटीचे बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत सापळा लावला. रात्रौ २१:२५ वाचे सुमारास एक इसम सदर ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत अंधारात थांबलेला दिसून आला. पोलीसांनी बातमीदासह चालत जावून खात्री केली असता सदर इसम हाच गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्री करीता आल्याची खात्री झाल्यानंतर सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शेख अहमद उर्फ बबलू सुरज सय्यद, वय १९ वर्षे, धंदा नोकरी, रा. आदर्श चाळ, राजिव गांधी नगर, रामराज्य शाळे शेजारी, सुखसागरनगर, अप्पर बिबवेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले. पोलीसांनी त्यास सदर ठिकाणी कशाकरीता आला आहे असे विचारून त्याचे हातात असलेल्या पांढया रंगाच्या पिशवीमध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्याने उडवा उडवीची व असमाधानकारक उत्तरे दिली. पोलीसांनी सदर इसमाची सोबत असलेले पंचांकरवी अंगझडती घेतली असता त्याचे हातातील पिशवीमध्ये एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला. तसेच त्याचे जीन्स पँटचे मागिल बाजुस एक देशी बनावटीचे पिस्टल खोवलेले व पँटचे पुढील बाजुच्या उजव्या खिशामध्ये पिस्टलचे मॅगझीन व मॅगझीनमध्ये ०३ जिवंत काडतुसे मिळुन आले. त्याच्याकडे अग्नीशस्त्राचा परवाना आहे अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे अग्नीशस्त्राचा परवाना नसल्याचे सांगित्याने त्याचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं. ३८१/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचे ताब्यातून ०१ देशी बनावटीचे पिस्टल, एक देशी बनावटीचा कट्टा व ०३ जीवंत काडतुसे असा एकुण ७१,५००/- रू किं चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त सो., मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त सो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ – ५, राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त सो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री रऊफ शेख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री नवनाथ जगताप यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोहवा / विशाल मेमाणे, पोहवा/निलेश देसाई, पोहवा / गोरखनाथ चिनके, पो.हवा / सतिश चव्हाण, पो.अं. / लक्ष्मण होळकर, पो.अं./सुजित मदन, पो.अं. / संतोष बनसुडे, पो. अं. / सैफ पठाण, पो.अं./अभिजीत जाधव, पो.अं./अभिजीत रत्नपारखी, पो. अं. / विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!