संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
दिनांक.१६/०४/२०२५ रोजी पहाटे ४/३० वा ते ५/०० वाजताचे दरम्यान लक्ष्मीनगर, लेन नं ३, कोंढवा बु. पुणे तसेच आश्रफनगर गल्ली नं ७, सर्वे नं ५ कोंढवा ५ ते ६ इसमांनी मोठ मोठयाने आरडा ओरड करून, शिवीगाळ करून कोण “बीच में आने का नही एक एक को खलास कर दुगां” असे मोठयाने ओरडुन दहशत निर्माण करून फिर्यादी यांना तसेच इतरांच्या दुचाकी गाड्या, टेंम्पो तसेच
रिक्षा फोडून नुकसान करून दहशत निर्माण केली होती. त्या अनुषंगाने दि. १६/०४/२०२५ रोजी कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे सदर अनोळखी इसमांचे विरोधात गु.र.नं. ३१७/२०२५ भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम ३२४ सह कलम भारतीय हत्यार कायदा कलम ४,(२५) क्रिमीनल लॉ ॲमेडमेंट अॅक्ट ३,७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) ३/१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा करणाया आरोपींचा शोध घेण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख, कोंढवा पोलीस स्टेशन यांनी कोंढवा पोलीस स्टेशनकडील तपास पथकाला वरील गंभीर दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आदेशीत करण्यात केले होते. त्याअनुषंगाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांच्या पोलीस स्टाफने आजु बाजुचे सी.सी.टी.व्ही ची पाहणी करून इसम नामे १) शाहीद रहीम शेख, वय २) रिहान हारून शेख, ३) सोहेल जम्मालुद्दीन काझी. 4) नवाज अजीज शेख 5) अल्फाज मुर्तजा बागवान ६) यश विजय सारडा 7) अमन कबीर इनामदार सर्व राहणार मिनाताई ठाकरे वसाहत, इंदिरा नगर पॉवर हाऊसचे मागे, गुलटेकडी पुणे. यांना ताब्यात घेवुन गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांना ४ दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेवून त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरलेली वाहने व हत्यारे जप्त करण्यात आलेली आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त सो., मा. अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त साो., श्री रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त सो., पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त सो., परिमंडळ – ५, डॉ, श्री राजकुमार शिंदे, मा.सहा.पोलीस आयुक्त साो., वानवडी विभाग, श्री धन्यकुमार गोडसे, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक साो., विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक(गुन्हे) श्री अब्दुल रौफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, गोरखनाथ चिनके पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुरज शुक्ला, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी सुजित मदन, राहुल थोरात, सुहास मोरे, विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























