संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! युनिट-२ गुन्हे शाखा,पुणे शहर !
स्वारगेट पोलीस स्टेशन चे हददीमध्ये धोबीघाट पुणे येथे दिनांक ०४/०४/२०२६ उसने पैसे मागणे वरुन झालेल्या वादावरुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केले बाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३ /२०२६ भारतीय न्याय सहिता कलम १०९,११५ (१),३५१(१), ३५२,१८९ (२), ३(५) अन्वये गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीतांचा युनिट २ प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व युनिट २ कडील अंमलदार शोध घेत असताना युनिट २ कडील पोलीस अंमलदार सददाम तांबोळी व अजीम शेख यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरुन दिनांक ४/४/२०२६ रोजी मार्केटयार्ड बिबवेवाडी येथून गुन्हयातील पाहिजे आरोपी नामे १) रेहान ऊर्फ खिमा फिरोज शेख वय २० वर्ष रा. काशेवाडी भवानी पेठ गल्ली क्रमांक १० पुणे २) गौरव गणेश गुजर वय २० वर्ष रा काशेवाडी भवानी पेठ गल्ली क्रमांक १० पुणे यांना ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली आहे. तसेच दिनांक १०/०४/२०२६ रोजी गुन्हयातील पाहिजे आरोपी ३) अतिक हारुण अतार वय २१ वर्ष रा. काशेवाडी भवानी पेठ पुणे यास भवानी पेठ पुणे येथून गुन्हयाचे कामी ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.अशा प्रकारे गंभीर गुन्हयातील एकुण ३ आरोपीतांना गुन्हे शाखा युनिट २ कडील अधिकारी अंमलदार यांना शोध घेवून अटक केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त श्री निखिल पिगंळे,मा.पोलीस उप आयुक्त गुन्हे – १ श्री शैलेश संखै यांचे मार्गदर्शनाखाली युनिट २ कडील प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस अंमलदार सददाम तांबोळी, अजीम शेख, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, नागनाथ राख, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, विशाल दळवी, विनोद चव्हाण, संजय सरगर, संतोष टकले, रुषिकेश व्यवहारे, शिवानंद कायगुडे, विजयकुमार पवार, संदिप शिर्के,ओमकार कुंभार, संजय आबनावे व विनायक वगारे या पथकाने केली .

मुख्य संपादक : – इमरान शेख


























