Homeक्राईमपुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; तीन कोटींचा गांजा आणि दोन इनोव्हा...

पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; तीन कोटींचा गांजा आणि दोन इनोव्हा कार जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण !

नशामुक्त भारत अभियानाची सुरूवात भारत सरकारचे वतीने करणेत आलेली असून युद्धपातळीवर प्राधान्याने कारवाया करून भारत देश नशामुक्त करण्याचे अनुषंगाने पुणे ग्रामीण हद्दीत अंमली पदार्थ तसेच तंबाखूजन्य पदार्थाची बेकायदेशीर रित्या विक्री अगर सेवन होवू नये या करीता पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक, श्री संदीप सिंह गिल्ल साहेब यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा बडगा चालू ठेवला आहे. अवैध रित्या अंमली पदार्थ व तंबाखूजन्य पदार्थ विनापरवाना जवळ बाळगणारे विक्री करणारे व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीण पोलीसांना केले आहेत.

बारामती शहर गु.र.नं. ७८/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(c), २०(b) (ii) (c), २९ प्रमाणे दि. २८/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात जळोची पिंपळी रोड, ता. बारामती जि. पुणे येथील भारत कांबळे यांचे शेताचे परिसरात दोन प्लास्टीकचे ड्रमात सुमारे ४७८.९५० किलो ग्रॅम वजनचा किं.रू. २,३९,४७,५००/- चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने विक्री करण्याचे उद्देशाने साठविलेला मुद्देमाल मिळून आला आहे. त्याबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविणेत आला आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध रित्या साठविलेला गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण यांनी बारामती शहर पो.स्टे. व स्था.गु.शा. कडील दोन पथके गुन्हयाचे तपास कामी नियुक्त केली. गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करून अंमली पदार्थ गांजा हा आरोपींनी कोठून आणला आहे अगर कशा प्रकारे उपलब्ध केला आहे? तसेच पुढे तो कोणाला विक्री करणार होते? याबाबत तपास करण्याच्या सुचना करून मार्गदर्शन केले होते. सदर गुन्हयाचा दोन्ही पथकांकडून समांतर तपास सुरू करणेत आला, रेकॉर्डवरील आरोपींबाबत माहिती घेण्यात आली. तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, नमुद गांजा हा रेकॉर्डवरील आरोपी १) समाधान धर्मराज गायकवाड सध्या रा. सांगवी ता. बारामती जि.पुणे २) विकी ऊर्फ पप्पु कांबळे सध्या रा. तांदुळवाडी ता. बारामती जि. पुणे यांनी त्यांचे साथीदारांचे मदतीने खरेदी करून आणला व साठवून ठेवला आहे. अशी बातमी मिळाल्याने बातमीचे आधारे दोन्ही आरोपीबाबत माहिती घेण्यात आली. दोन्ही आरोपी हे परिसरातून निघून गेलेले होते, त्यामुळे त्यांचेवर संशय बळावला. तांत्रिक विश्लेषणाचे व गोपनीय बातमीचे आधारे वर नमुद गुन्हयाचे कामी आरोपी १) प्रकाश ऊर्फ पक्या मोहन काटे, वय २९ वर्षे, रा. कल्याणीनगर, तांदुळवाडी, ता. बारामती जि.पुणे २) समाधान धर्मराज गायकवाड, वय २३ वर्षे सध्या रा. सांगवी ता. बारामती जि.पुणे मुळ रा. अरणगाव ता. परांडा जि. धाराशीव, ३) प्रिन्सकुमार मुन्ना सिंग वय २२ वर्षे, रा. पुरानी मठीया पसनौली, महाराजगंज, सिवान राज्य बिहार, ४) राहुल कल्याण गोरे वय २७ वर्षे रा.उंब्रद पारगाव ता.जि.बीड यांना दि. ०३/०५/२०२६ रोजी तांदुळवाडी परिसरातून ताब्यात घेवून अटक करणेत आली. आरोपींकडे तपास केला असता, आरोपींनी त्यांचे साथीदार नामे ५) विकी ऊर्फ पप्पू कांबळे, रा. तांदुळवाडी ता. बारामती जि. पुणे ६) संग्राम ऊर्फ चंदन सिंग रा. आर७ ए १००६ मारुंजी रोड, झेनिबीया स्कुलजवळ, कोलते पाटील इस्टेट मारुंजी पुणे, ७) जॉकी माझी रा. बुधणी मोना बघमारी चंद्रगिरी गजापती ओडीसा यांचे मदतीने छत्तीसगड येथून गांजा आणून साठवून ठेवला असल्याचे सांगितले.

आरोपी विकी कांबळे, संग्राम चंदन सिंग, जॉकी माझी यांचा बारामती शहर पोस्टे व स्था.गु.शा.ची पथके शोध घेत होते. दरम्यान स्था.गु.शा.चे पथकाला गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी विकी कांबळे, संग्राम ऊर्फ चंदन सिंग हे इतर साथीदारांसह दोन चारचाकी वाहने घेवून छत्तीसगड येथे गेले आहेत. त्या अनुषंगाने तपास सुरू करणेत आला, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराचे मदतीने बातमी मिळाली की, दि.२०/०५/२०२६ रोजी पाहिजे असलेले दोन्ही आरोपी हे साथीदारांसह दोन टोयोटा इनोव्हा कार मधून पंढरपुर-फलटण मार्गे बारामती येथे येत आहेत, अशी बातमी मिळाली, बातमीचे आधारे पाहिजे आरोपींचा शोध घेणेकामी कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून स्था.गु.शा. व बारामती शहर पो स्टे कडील दोन पथकांनी दि. २०/०५/२०२६ रोजी दोन इनोव्हा कारचा पाठलाग सुरू केला, पाठलाग करत असताना एक इनोव्हा कार ही  फलटण मार्गे बारामतीच्या दिशेने निघाली, त्याचबरोबर दुसरी इनोव्हा कार ही तासगावच्या दिशेने निघाली. त्यानंतर एकेक पथक संशयित वाहनांचा पाठलाग करू लागले. तासगावचे दिशेने गेलेल्या इनोव्हा कार व पथकाचे वाहनामध्ये अंतर पडल्याने पुणे ग्रामीण पोलीस पथकाकडून सांगली स्था.गु.शा. यांना संशईत इनोव्हा कारची माहिती देण्यात आली. सांगली स्था.गु.शा.चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी दि. २०/०५/२०२६ रोजी सायंकाळी १८/३० वा. सुवास सोनेरी रंगाची इनोव्हा कार नं. एम.एच. ०२ सी.झेड ०३०२ ही ताब्यात घेवून त्या वाहनातील आरोपी विकी ऊर्फ पप्पू विजय कांबळे वय ३२ वर्षे रा. भिमनगर जळोची ता. बारामती जि. पुणे यास ताब्यात घेतले तसेच इनोव्हा कारची तपासणी केली असता, इनोव्हा मध्ये १३४ किलोग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ किं.रू. ३३,५५,०००/- चा मिळून आला असून त्याबाबत एमआयडीसी कुपवाड पो स्टे सांगली गु.र.नं. १२४/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(c), २०(b) (ii) (c), २९ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.

 

त्याचप्रमाणे पुणे ग्रामीण पोलीसांचे दुसऱ्या पथकाने दि. २१/०५/२०२६ रोजी स. ०६/३५ वा. सुगास फलटण रोडवरील गवारे चौक, बारामती ता. बारामती जि पुणे येथे इनोव्हा कार नं. एमएच. ०२ ई.ई. ४९४९ हिचेवर कारवाई करून गाडी ताब्यात घेतली असता, २३ किलो ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ किं.रू. ११,५५,०००/- चा व आरोपी १) हुसेन सुखदेव लष्करे, वय ३५ वर्षे रा. सुतारदरा, काळुबाई कॉलनी, गल्ली नं. ३०, कोथरूड पुणे, २) आदित्य विकास शिंदे वय २० वर्षे, सुतारदरा, काळुबाई कॉलनी, गल्ली नं. ५, कोथरूड पुणे ३) युवराज ज्ञानेश्वर दुर्गे रा. सुतारदरा, कोथरूड पुणे मुळ रा. होताळे ता. मुळशी जि पुणे हे मिळून आले आहेत. त्यांचेविरोधात कायदेशीर कार्यवाही करून बारामती शहर पो. स्टे.गु.र.नं. १९०/२०२६ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (c), २०(b)(ii) (c), २९ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.

 

आरोपी विकी ऊर्फ पप्पु विजय कांबळे हा इतर साथीदारांचे मदतीने छत्तीसगड येथून गांजा खरेदी करून आणत असून साथीदारांचे मदतीने पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा जिल्हयात अवैध गांजा विक्री करणारे व्यवसायिकांना अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. स्था.गु.शा. व बारामती शहर पोस्टे चे पथकांनी मोठ्या प्रमाणात अवैध रित्या गांजा अंमली पदार्थ खरेदी करून आणून त्याची विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय गांजा तस्करीच्या टोळीतील सात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. कारवाई मध्ये एकूण ६३४ किलो ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने, इतर मुद्देमाल असा एकूण ३,०३,९६,०००/- रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.गांजा अंमली पदार्थाचे तस्करी मधील एक मोठ आंतरराज्यीय रॅकेट जेरबंद करण्यात स्था.गु.शा. व बारामती शहर पोस्टे यांना यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोस्टे चे पोनि श्रीशैल्य चिवडशेट्टी, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, ग्रेड पोसई बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, बारामती शहर पो स्टे कडील पोसई रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, अक्षय सिताप, विशाले शिंदे, सागर जामदार, बनसोडे, झणझणे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...
error: Content is protected !!