Homeक्राईमस्मार्ट सिटी सिग्नल बॅटरी चोरी प्रकरण उघडकीस; वानवडी पोलिसांची मोठी कारवाई.

स्मार्ट सिटी सिग्नल बॅटरी चोरी प्रकरण उघडकीस; वानवडी पोलिसांची मोठी कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

पुणे शहरामध्ये सिग्नलचे चौकांमध्ये लाईट गेल्यानंतर चौकामध्ये असलेल्या ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील बॅटरीवर सिग्नल चालु राहतो त्यामुळे वाहतुक सुरळीत चालण्यास मदत होते. सदरचे ट्राफिक कंट्रोलर बॉक्स व त्यामध्ये बॅटरी बसविणे आणि इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत मे.विंध्या टेली लिंक्स लि. ही कंपनी पाहते. सदर कंपनीकडुन वानवडी पोलीस ठाणे हद्दीतील काळुबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक, रेस कोर्स चौक या सिग्नलच्या चौकातील ट्राफिक कंट्रोलर बॉक्समधील ०६ बॅटरी चोरीस गेलेबाबत दि. २७/०१/२०२६ रोजी तक्रार प्राप्त झालेवरुन त्याबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २९/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असुन, सदरचा गुन्हा हा पुढील तपासकामी तपासपथक अधिकारी पोलीस उपनिरिक्षक अल्फाज शेख यांचेकडे देण्यात आला होता.
सदर गुन्हयांचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे वानवडी पोलीस ठाणेकडील तपासपथक प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरिक्षक उमाकांत महाडिक व पोलीस उपनिरिक्षक अल्फाज शेख यांनी स्टाफसह काम सुरु केले आणि सदर अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेज पाहुन तसेच बातमीदारामार्फत माहीती काढण्याचे काम चालु असताना, दि. ३०/०१/२०२६ रोजी पो. अंमलदार आशिष कांबळे व बालाजी वाघमारे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “इसम नामे दिपक कांबळे व त्याचे ३ मित्रांसह रेसकोर्स, काळुबाई चौक व इतर ठिकाणी लावलेले सिग्नल बॉक्समधील बॅट-या चोरी केले असुन ते विक्री करणेकामी त्याचेकडील रिक्षा एम.एच.-१२/एस.के. २०२४ यामध्ये फिरत असुन ते शेवकरवस्तीजवळील रेल्वे फाटक जवळ, कचरा डेपोसमोर संशयितरित्या थांबलेले आहे.”
अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन वानवडी तपास पथक प्रभारी अधिकारी अल्फाज शेख आणि स्टाफ यांनी वरिष्ठांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे बातमीचे ठिकाणी पंचांसह जावुन संशयीत रिक्षाला चारही बाजुने घेराव घालुन रिक्षामध्ये बसलेले चार इसमांना जागीच पकडुन त्यांना आहे त्या स्थितीत ठेवुन त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे पत्ते विचारता त्यांनी त्यांची नावे १) दिपक अमोल कांबळे, वय. ३२ वर्षे, धंदा. रिक्षाचालक, रा. सर्वे नं. १०८/१०९, मक्का मज्जीद जवळ, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे व पाठीमागे बसलेले इसम २) चाँद उस्मान शेख, वय २८ वर्षे, धंदा. स्क्रॅप व्यवसाय, रा. सदर, ३) विकास उर्फ टकल्या विजय माने, वय ३६ वर्षे, धंदा. भंगार वेचणे, रा. अरोरा टॉवर्सजवळ, फुटपाथवर, कॅम्प, पुणे व ४) अली मुल्ला शेख, वय- २७ वर्षे, धंदा- मजुरी, रा. स.नं. ५५, भाग्योदयनगर, भैरवनाथ मंदिराजवळ, कोंढवा, पुणे अशी असल्याची सांगीतली त्यावेळी त्यांचेकडील नमुद रिक्षाची पंचांसमक्ष पाहणी करता सदर रिक्षामध्ये एक लोखंडी कटावणी व एकुण ६८,०००/-रुपये किंमतीच्या एकुण ३४ बॅटरी मिळुन आल्या. तसेच त्यांनी गुन्हा करणेकामी वापरलेली वर नमुद रिक्षा आणि लोखंडी कटावणी असा एकुण १,६८,१००/- रु. किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडुन हस्तगत करण्यात आलेलाआहे.  सदरच्या बॅटरी त्यांनी काळुबाई चौक, ए.एफ.एम.सी. चौक, रेस कोर्स चौक, बी.टी. कवडे चौक, शास्त्रीनगर व सांदलबाबा चौक धोबी घाट चौक आणि सिटीप्राईट / पुष्पमंगल चौक येथुन चोरी केल्याचे सांगीतले. त्यावरुन खात्री करता त्यांचेकडुन खालीलप्रमाणे गुन्हे उघड झालेले आहेत.

गुन्हा रजि. नं. २९/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे

१) वानवडी पोलीस ठाणे २) वानवडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३० / २०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ ( २ ) प्रमाणे ३) लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ६५/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे ४) लष्कर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १८/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३ ( २ ) प्रमाणे ५) मार्केटयार्ड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १४/२०२६, भारतीय न्याय संहीता कलम ३०३(२) प्रमाणे

वरीलप्रमाणे गुन्हे उघड झाले असुन वरील आरोपीत यांना वानवडी पो. स्टे. गु.र.नं. २९/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) या गुन्हयामध्ये अटक करुन मा. न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे श्री मनोज पाटील, शहर, मा.पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर, श्रीमती नम्रता देसाई, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भाऊसाहेब वानवडी पो. स्टे पुणे शहर श्रीमती संगीता जाधव, यांचे सुचना व सहा. पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व पोलीस अंमलदार महेश गाढवे, दया शेगर, अतुल गायकवाड, अमोल पिलाणे, आशिष कांबळे, बालाजी वाघमारे, विठ्ठल चोरमले, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, अभिजित चव्हाण, अर्शद सय्यद या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!