संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर !
चतुःशृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४०२/२०१२ भादंवि कलम ३०७, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), मपोका. कलम ३७(१)सह १३५ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी अनमोल अतुल जाधवराव वय ३६ वर्ष रा. सुरज नगर, बिल्डिंग नंबर – बी / ४, फ्लॅट नंबर १, महाराजा कॉम्पलेक्स जवळ, कोथरुड डेपो समोर, पुणे यास मा. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर आरोपी अनमोल अतुल जाधवराव हा न्यायालय परिसरातून पळून गेला होता. तेव्हा दिनांक १९/०७/२०२५ रोजी सदर बाबत शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ११०/२०२५ बी. एन. एस. कलम २६२ प्रमाणे अनमोल अतुल जाधवराव याचेविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अनमोल अतुल जाधवराव हा वेगवेगळे वेषभुषा करुन नाशिक, मुंबई, सातारा, सांगली, तसेच पुण्यातील पौंड, मुळशी, हवेली असे वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वेषभुषा करुन वावरत होता. दिनांक ०६/१०/२०२५ रोजी पोना. २२९७ सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ११०/२०२५ बी. एन. एस. कलम २६२ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अनमोल अतुल जाधवराव हा अहिल्यानगर कडून वाघोली पूणे या दिशेने चारचाकी गाडीने येत आहे. अशी माहिती मिळाल्याने सदरची बातमी आम्ही सोबतच्या स्टाफला सांगून मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळवली असता वरिष्ठांनी आम्हास योग्य त्या सुचना देवून बातमीची खात्री करुन कायदेशिर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने आम्ही मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून सापळा लावण्यात आला, मिळालेल्या माहिती प्रमाणे कावेळी हॉटेल समोर, खांदवे नगर येथे एक चारचाकी गाडी नंबर एम एच ०४ ई एक्स ८२४४ या गाडी आल्याने सदर गाडीस चारही बाजूने सापळा लावून त्यास जागीच पोलीस स्टाफच्या मदतीने १६ / ३० वा. ताब्यात घेतले तेव्हा सदर फोरव्हिलरमध्ये दोन इसम होते. तेव्हा त्यांना प्रथम आम्ही आमची व सोबतच्या पोलीस स्टाफची ओळख सांगून त्यांना त्याचा पुर्ण नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव न सांगता उडवा उडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे अधिक चौकशी कामी दोन्ही इसमांना शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे आणून दोन्ही इसमांकडे कसून चौकशी केली असता त्यापैकी एकाने त्याचे नाव अनमोल अतुल जाधवराव वय ३६ वर्ष रा. सुरज नगर, बिल्डिंग नंबर – बी / ४, फ्लॅट नंबर १, महाराजा कॉम्पलेक्स जवळ, कोथरुड डेपो समोर, पुणे असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली, आरोपी अनमोल अतुल जाधवराव याने तपासात सांगितले की, टि. व्हि. वरील क्राईम पेट्रोल, सावधान इंडिया, सी आय डी हे सिरीअल पाहून पोलीस आरोपी यास शोध घेण्यासाठी कसे प्रयत्न करतात हे माहिती झाल्याने मी १०० ते १५० किलोमिटर अंतर बदलून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना माझा मोबाईल फोन हरवलेला आहे माझ्या घरांशी संपर्क करावयाचा आहे असे कारण सांगून माझ्या मित्रांशी संपर्क करत होतो. संपर्क झाल्याने नंतर लगेच ते ठिकाण मी बदलत असे तपासात सांगितले नंतर त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आरोपी सोबत वाहनातील दुसरा इसमांस विचारणा करता त्याचे नाव अक्षय संजय हंपे वय ३० वर्ष रा. सौरभ नगर, भिगार, अहिल्यानगर असे सांगितले व त्याच्याकडे कसून चौकशी केली असता समजले की, सदरचा इसम हा अहिल्यानगर येथील भिगांर कॅम्प पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नंबर ६१२/२०२५ बी. एन. एस. १०९, ३(५) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहे. सदर बाबत मा. वरिष्ठांना माहिती देऊन संबधीत पोलीस स्टेशनच्या
प्रभारी अधिकारी श्री जगदीश मुलगीर सपोनि. यांना माहिती देऊन पुढील कारवाई करीता त्यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
तसेच आरोपी अनमोल अतुल जाधवराव याच्यावर यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) चतुःश्रृंगी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ४०१ / २०१२ भादंवि कलम ३०७, आर्म अॅक्ट कलम ४(२५), मपोका. कलम ३७ (१) सह १३५
२) कोथरुड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५०९/२०१६ भादंवि कलम ३५४, ३५४(डी), ३२३, ३२५, ५०४, ५०६(२),३४ ३) कोथरुड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३०२८/२०१६ भादंवि कलम १८८
४) कोथरुड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३०१ / १८ आर्म अॅक्ट ३ (२५) व मपो अधि. का. कलम ३७ (१),१३५ ५) कोथरुड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ५० / २०१९ भादवि. आर्म अॅक्ट ३ (२५), म.पो.अधि.३७
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, मा. पोलीस उप आयुक्त कृषिकेश रावले, मा. सहा. पोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय पिगंळे, पोउपनि अजित बडे, पोउपनि प्रमोद पाटील, पोहवा. दिपक चव्हाण, पोहवा. राजकिरण पवार, पोना. सचिन जाधव, पोना. दिपक रोमाडे, पोशि सुदाम तायडे, पोशि. श्रीकृष्ण सांगवे, पोशि. इसाक पठाण, तेजस चोपडे, पोशि. दिनेश भोसले यांनी केली आहे. पोशि.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























