Homeक्राईमवारजे माळवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगीरी ! सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळून...

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगीरी ! सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळून २,७०,०००/- र. किंमतीचा मुदेमाल जप्त करुन ३ गुन्हें उघडकीस.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

वारजे परीसरातील महामार्गाच्या बाजुला असणा-या सर्विस रोडवरुन महामार्गावर जाण्यासाठी मार्ग असल्याने अनेकदा या सर्विस रोडवर एकट्या दुकट्या महिलेला पाहुण मोटार सायकल वरुन जाणाऱ्या तरुणांनी सोनसाखळी खेचुन पळुन गेल्याची उदाहरणे मागील काही वर्षापासुन आढळुन येत आहे. यावर्षी अशाप्रकारच्या ४ घटना वारजे महामार्ग परीसरात सर्विस रोडवर घडलेल्या होत्या. त्याअनुशंगाने या गुन्ह्यांना प्रभावी पायबंद करण्यासाठी व असे गुन्हे उघडकीस आणण्याची गरज लक्षात घेवुन तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री संजय नरळे यांच्या नेतृत्वात एक पथक केले होते. सदर पथकाने मागील दोन आठवड्यांपासुन सातत्याने या अनुशंगाने वेगवगळ्या ठिकाणचे सि सि टी व्ही पाहणे, खबरी तयार करणे, लोकांच्या भेटी घेणे, जुन्या गुन्ह्यांचा अभ्यास करणे अशा प्रकारे काम करुन ती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत काईंगडे यांना दिलेली होती व त्यावर काम चालु होते. सदर माहीतीच्या विश्लेषणातुनच पोलीस अंमलदार निखील तांगडे व अमित शेलार यांना अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणा-या इसमाबाबत माहीती मिळाली की, सदरचे इसम हे एन डी ए ग्राउंड, वारजे येथे उभे आहेत. त्याबाबत सदरची माहीती वरिष्ठांना कळवून त्यावरुन पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, अमित जाधव यांनी सदर इसमांचा शोध घेवुन एन डी ए ग्राऊंड येथुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारता त्यांनी त्यांचे नाव १)आकाश आंबादास आंधळे, वय – २४ वर्षे, रा. दागंट पाटील नगर एक नंबर कमान, शिवणे, पुणे २) सुजल नरेश वाल्मिकी, वय – २० वर्षे, रा. दांगट पाटील इस्टेट दुसरी कमान, शिवणे, पुणे असे सांगितले. सदर इसमांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु त्यांना पोलिसी भाषेत विचारपुस केल्यानंतर त्यांनी खालीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन चोरी केलेले सोन्याचे दागिणे व गुन्हा करताना वापरलेली मोटारसायकल असा एकुण २,७०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उघडकीस आलेले गुन्हे
गुन्हा रजि. नंबर व कलम
अ.क्र.
पोलीस स्टेशन

वारजे माळवाडी | १०/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५)

वारजे माळवाडी ९३ /२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५)
वारजे माळवाडी १५४ / २०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३(५)

सदरची कामगिरी ही मा. श्री संभाजी कदम, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०३ पुणे शहर, मा. श्री भाऊसाहेब पटारे, सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली मा. श्री विश्वजीत काईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व मा.श्री निलेश बडाख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांचे देखरेखीत तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार संजीव कळंबे, शरद वाकसे, अमित शेलार, ज्ञानेश्वर चित्ते, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखील तांगडे, योगेश वाघ, गोविंद कपाटे, अमित जाधव, गणेश शिंदे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारजे पोलिसांची कारवाई : अल्पवयीनाकडून ६ चोरीच्या दुचाकी हस्तगत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर ! वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस...

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

error: Content is protected !!