Homeक्राईमलोणी काळभोर पोलीसांनी मोबाईल स्नॅचींगचे आरोपीतांना केली अटक, अटक आरोपींकडुन एकुण ४,६९,०००/-...

लोणी काळभोर पोलीसांनी मोबाईल स्नॅचींगचे आरोपीतांना केली अटक, अटक आरोपींकडुन एकुण ४,६९,०००/- रुपयांचे मोबाईल व दुचाकी केली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत दि. १७/०५/२०२५ रोजी रात्रौ २१/०० वा. चे सुमारास इसम नामे अनिरुध्द संतोष खताळ रा. कदमवाकवस्ती पुणे हे त्यांचा मित्र नामे राजिव शहा यांचे सोबत, कदमवाकवस्ती येथील जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे समोर, पुणे सोलापुर रोड लगत असलेल्या सर्वीस रोड ने पायी चालत जात असताना, दोन अनोळखी इसम एका मोपेड दुचाकी गाडीवरुन पाठीमागुन आले व त्यांनी अनिरुध्द संतोष खताळ यांचे हातातील विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट हिसकावुन घेवुन चोरुन नेला. सदर बाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस दि. १७/०५/२०२५ रोजी गु. र. नं. २१६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकास खबर प्राप्त झाली की दि. ०७/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयातील आरोपीत इसम हे गुन्हयात चोरुन नेलेला मोबाईल विकण्यासाठी कवडीपाट टोल नाका, कदमवाकवस्ती येथे येणार आहेत. सदर खबर प्राप्त होताच पोलीस उप निरीक्षक श्री अनिल जाधव व त्यांचे पथकाने कवडीपाट टोलनाका येथे सापळा रचुन दुचाकी मोपेड गाडीवरुन आलेल्या दोन संशयीत इसमांना दि. ०७/०७/२०२५ रोजी ताब्यात घेतले. सदर इसमांकडे त्यांचे नाव पत्त्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) विशाल विलास काळे वय २३ वर्षे रा. ढेरे बंगल्याजवळ, गोपाळपट्टी, मांजरी पुणे २) रितेश भिमराव चव्हाण वय १८ वर्षे रा. गोपाळपट्टी मांजरी रोड, पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांना लोणी काळभोर पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीमध्ये लोणी काळभोर पोलीस ठाणे गु. र. नं. २१६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४, ३ (५) मधील फिर्यादी यांचा हिसकावुन चोरुन नेलेला विवो कंपनीचा मोबाईल मिळुन आला. सदर मोबाईल दाखल गुन्हयातील फिर्यादी यांचा असल्याची खात्री झाल्याने तसेच त्यांचे ताब्यातील दुचाकी मोपेड गाडी ही त्यांनी गुन्हयात वापरलेली असल्याचे आरोपींनी कबुल केल्याने सदर मोबाईल व दुचाकी मोपेड अॅक्टीवा गाडी त्यांचेकडुन प्रथमतः जप्त करणेत आली व दाखल गुन्हयात आरोपीतांना दि. ०७/०७/२०२५ रोजी १९/५० वा. अटक करणेत आले..
सदर गुन्हयाचे अनुषंगाने आरोपींकडे सखोल तपास केला असता नमुद आरोपीकडुन दाखल गुन्हयातील मोबाईल व्यतिरीक्त आणखी विवीध कंपनीचे १८ अॅन्ड्रॉईड मोबाईल हॅन्डसेट जप्त करणेत आले आहेत. सदर १८ मोबाईल हॅन्डसेट हे आरोपीने विवीध ठिकाणी अशाचप्रकारे चोरले असल्याचे कबुल केले आहे. सदर मोबाईल चोरीबाबत इतर पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत अगर कसे, याबाबत लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदर गुन्हयाचे तपासादरम्यान पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव व त्यांचे पथकाने अटक आरोपीकडुन एकुण ४,१९,०००/- रुपयांचे एकुण १९ मोबाईल फोन व ५०,०००/- रुपये किंमतीची अॅक्टीवा मोपेड गाडी असा एकुण ४,६९,०००/- रुपयांचा मुद्देमाल आजपावेतो जप्त करणेत आला असुन, सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
सदरची उत्कृष्ठ कामगिरी मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती स्मिता पाटील, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, पोहवा संभाजी देवीकर, गणेश सातपुते, रामहरी वणवे, सागर जगदाळे, तेज भोसले, आण्णा माने, पो.शि. बाजीराव विर, शैलेश कुदळे, योगेश पाटील, चक्रधर शिरगिरे, राहुल कर्डीले, प्रविण दडस, प्रदिप गाडे, सचिन सोनवणे, सुरज कुंभार, मपोशि उषा थोरात यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!