Homeक्राईमलोणी काळभोर पोलीसांची पुन्हा एकदा फटाके फोडणारे बुलेटराजांवर केली कारवाई...

लोणी काळभोर पोलीसांची पुन्हा एकदा फटाके फोडणारे बुलेटराजांवर केली कारवाई…

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर !

मागील काही दिवसांपुर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही इसम त्यांचे ताब्यातील बुलेट दुचाकीचे सायलन्सर बदलुन मोठमोठयाने कर्णकर्कष्य आवाज काढुन फटाके फोडत असलेबाबत तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रार प्राप्त होताच अशा टवाळखोर बुलेटराजांचा बंदोबस्त करण्याकरीता लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाणे स्तरावर वेगवेगळे पथके तयार करुन त्यांना लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील कर्णकर्कष्य आवाज काढणाऱ्या दुचाकी गाड्यांचा शोध घेउन कारवाई करणेबाबत आदेशित केले.

त्यानुसार लोणी काळभोर पोलीसांनी दि. ३०/०८/२०२५ रोजी पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीरित्या गस्त घालुन, कर्णकर्कष्य आवाज काढत तसेच बुलेटचे फटाक्यांसारखे आवाज काढत बुलेट दुचाकी चालवीणारे एकुण १८ दुचाकी चालकांच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेणेत आल्या. सदर दुचाकींचे सायलेन्सर पोलीसांनी चेक केले असता ते कंपनीचे नसल्याने त्यांचेवर हडपसर वाहतुक विभागाचे पोलीस हवालदार सतिश टेंगले, पोलीस अंमलदार सचिन कांबळे यांच्यामार्फत कायदेशिर कारवाई करुन एकुण १८,०००/- रु. चा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच सदर दुचाकी गाड्यांचे मॉडीफाईड सायलेन्सर काढुन त्यांना कंपनीचे सायलेन्सर बसविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सदर दुचाकींचे कर्नकर्कष्य हॉर्न देखील काढुन घेणेत आले असुन त्याबाबत देखील कारवाई करणेत आली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५, डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, श्रीमती अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ नाळे, पोलीस हवालदार रामहरी वणवे, वैजीनाथ शेलार, संदिप जोगदंड, रवि आहेर, महेश चव्हाण, सुनिल नागलोत, प्रदिप क्षिरसागर, तेज भोसले, मंगेश नानापुरे पोलीस शिपाई ईश्वर भगत, बालाजी बांगर हडपसर वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार सतिश टेंगले, सचिन कांबळे यांनी केली आहे.

या कारवाई मुळे लोणी काळभोर परिसरातील कर्णकर्कष्य आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर चाप बसविण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. भविष्यात अशाच प्रकारच्या अत्यंत प्रभावी व दर्जेदार कारवाया कर्णकर्कष्य आवाज काढणाऱ्या बुलेटराजांवर करणार असल्याची भावना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!