Homeक्राईमराजमुद्रा सोसायटीत टेरेसवर सुरू असलेला अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त; १२,४९५ रुपयांचा माल...

राजमुद्रा सोसायटीत टेरेसवर सुरू असलेला अवैध हुक्का पार्लर उद्ध्वस्त; १२,४९५ रुपयांचा माल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! सहकारनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ०९/०२/२०२६ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत गुलाबनगर चौकात आले असताना पो.हवा.अमोल पवार यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसरे मजल्याचे टेरेसवर धनकवडी पुणे येथे अवैध हुक्का पार्लर विनापरवाना चालु आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सदरची बातमी तपास पथकाचे पोउनि गणेश कर्चे यांना कळविली त्यांनी सदरची बातमी सहकारनगर पोलीस स्टेशन कडिल वरिष्ठ पालीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार यांना कळविली असता त्यांनी लागलीच तपास पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले.
त्यानुसार सहकारनगर पो.स्टे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी राजमुद्रा हौसींग सोसायटीतील मेहेर लिव्हींग बिल्डींग शेजारील श्री गुरु नानक कृपा बिल्डींगमधील तिसरे मजल्याचे टेरेसवर धनकवडी पुणे येथे प्रवेश करून जिन्याने टेरेसवर जावुन तेथील लाकडी दरवाजा तोडुन बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकला असता हॉलमध्ये एकुण ०६ टेबल मांडलेले दिसले. त्यामधील ०४ टेबलवर ०८ इसम हुक्का फ्लेवरचे सेवन करताना मिळुन आले. काऊंटरवर हजर असलेल्या इसमाकडे सदरबाबत चौकशी करता तेथे हॉटेल मालक व वेटर हे मिळुन आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता हॉटेल मालकाने त्याचे नाव १) राजसिंग भजनसिंग गोरोवाडा वय ३५ वर्षे राजमुद्रा सोसायटी धनकवडी पुणे २)पारस परमानंद शर्मा वय २४ वर्षे रा.सदर मुळ रा. नेपाळगंज जि.बाके नेपाळ ३) सुभाष मानसिंग गिरी वय २० वर्षे रा.सदर मुळ रा. कंचनपुर जि.बिलोरी नेपाळ ४ ) तिलक भोला तिवारी वय ३५ वर्षे रा. सदर मुळ रा. टिकापुर जि.कैलानी नेपाळ ५) नारायण मेघे आचार्य वय ३४ वर्षे रा. सदर मुळ रा. रा. टिकापुर जि.कैलानी नेपाळ अशी असल्याची सांगितली. हॉटेलच्या किचनची पाहणी केली असता तेथे विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीमसह टेबलवर मिळुन आलेले हुक्का पॉट व साहित्य तसेच किचनमधील विविध फ्लेवरचे हुक्का भरलेले चिलीम मिळुन आल्याने सदरचा १२, ४९५/- रु कि.चा माल पंचासमक्ष जप्त करुन त्यांचेविरुध्द सहकारनगर पो.स्टे येथे गु.र.नं. ४३/२०२६, भारतीय न्यायसंहीता २०२३ चे क. १२३, ३(५) तसेच सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे क. ४ अ, २१ अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कामगीरी मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, श्री. मिलींद मोहीते, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री.धन्यकुमार घोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. मनोजकुमार लोंढे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोउनि गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, सहा. पोउनि बापु खुटवड, व पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, किरण कांबळे, बजरंग पवार, सागर सुतकर, आशिष ढमाळ, निखील राजीवडे, अभिजीत वालगुडे, महेश भगत, आकाश किर्तीकर, खंडु शिंदे, अभिमान बागलाने, अमित पदमाळे, मारोती नलवाड, रफीक तडवी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!