Homeक्राईमबेकायदेशीर ०३ देशी गावठी कट्टे (अग्निशस्त्र) व ०३ जिवंत काडतुसे जवळ बाळगणारा...

बेकायदेशीर ०३ देशी गावठी कट्टे (अग्निशस्त्र) व ०३ जिवंत काडतुसे जवळ बाळगणारा सराईत गुन्हेगार बिबवेवाडी पोलीसांच्या जाळयात.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर

दि.०४/०७/२०२५ रोजी बिबवेवाडी पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अमलदार बिबवेवाडी पोलीस ठाणेचे हद्दीत आषाडी वारी व मोहोरम सणानिमित्त पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार शिवाजी येवले, आशिष गायकवाड यांना त्यांचे ख़ास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, “भुत बंगला रोड, अप्पर डेपोमागे, बिबवेवाडी पुणे येथे काळी पॅन्ट व क्रिम कलरचा शर्ट त्यावर लाल-निळ्या रंगाच्या उभ्या व आडव्या रेषा असलेला इसम कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे. त्याचे कमरेस एक पिस्टल आहे.” सदर बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते साो. बिबवेवाडी पो. स्टे यांना सांगितलेनंतर त्यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचनानुसास नमुद पोलीस अंमलदार, पंच असे बातमीच्या ठिकाणी जावुन इसम नामे शेख अहमद ऊर्फ बबलू सुरज सय्यद, वय- १९ वर्षे, रा. आदर्श चाळ, रामराज्य शाळेजवळ, राजीव गांधी नगर, बिबवेवाडी पुणे यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेता त्याचेकडे ५०,०००/- रुपये किंमतीचे ०१ लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व ५००/- रुपये किंमतीचे ०१ जिवंत काडतुस मिळुन आल्याने सदर इसमाविरुध्द पोलीस अंमलदार शिवाजी येवले यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने त्याचेवर बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १७१ / २०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) सह महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपीस दाखल गुन्हयात अटक करून त्याचेकडे तपास करता, त्याने निवेदन देवून १,००,०००/- रुपये किमतीचे लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे ०२ पिस्टल (अग्निशस्त्रे) व १०००/- रुपये किमतीचे ०२ जिवंत काडतुस काढून दिलेने निवेदन पंचनाम्याने जप्त करणेत आले आहेत. तरी आरोपी याचेकडून दाखल गुन्ह्यात एकुण १,५०,०००/- रुपये किमतीचे ०३ लोखंडी धातुचे गावठी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्रे) व १,५००/- रुपये किमतीचे ०३ जिवंत काडतुस असा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. तसेच त्याचेवर यापुर्वी दुखापतीचे व हत्यार बाळगलेबाबतचे गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ करत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी सातपुते, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ, तपास पथकातील अंमलदार पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अमलदार शिवाजी येवले, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, विशाल जाधव, रक्षित काळे, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ, संतोष बनसुडे, राहुल खाडे, दत्ता शेंद्रे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!