Homeक्राईमपोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ यांचेकडुन एकुण १० सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई.

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ यांचेकडुन एकुण १० सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी तसेच आगामी सण उत्सवाचे अनुषंगाने परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ प्रमाणे दोन टोळ्यातील ०७ गुन्हेगार व कलम ५६ प्रमाणे ०३ गुन्हेगार असे एकुण १० सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.

१ ) लोणी काळभोर पोलीस स्टेशन

अनिकेत गुलाब यादव, वय २२ वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळेच्या मागे, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे (बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे, दरोडा टाकणे, मारहाण करुन धमकावणे, जबरी चोरी करणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगणे यासारखे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत. ( तडीपार कालावाधी ०२ वर्षा करीता )

२ ) लोणी काळभोर पोलीस स्टेशन

प्रसाद उर्फ बाबु धनाजी सोनवणे, वय २१ वर्षे, रा. नायगाव रोड, चिंतामणी सोसायटीशेजारी, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे ( बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, दरोडा तयारी करणे यासारख एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत.

( तडीपार कालावाधी ०२ वर्षा करीता )

३ ) कोंढवा पोलीस स्टेशन

विश्वजीत भिमराव गायकवाड, वय ४० वर्षे, रा. स.नं. १३/५, भिमनगर, कोंढवा खुर्द, पुणे ( बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत . ( तडीपार कालावाधी ०२ वर्षा करीता )

४ ) कोंढवा पोलीस स्टेशन

१) करीम सय्यदअली सौदागर उर्फ लाला, वय २९ वर्षे, रा. स.नपं. ४२, मेट्रो टॉवर, २ रा मजला, फ्लॅट नं. २०२, कोंढवा खुर्द, पुणे (टोळी प्रमुख )
२) शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह, वय २५ वर्षे, रा. भाग्योदयनगर, गल्ली नं. २२, जरीयावाला बिल्डींग, फ्लॅट नं. १३, एवन सुपर मार्केट शेजारी, कोंढवा खुर्द, पुणे (टोळी सदस्य)
३) अझहर बशीर शेख, वय ३५ वर्षे, रा. स.नं. ५४ शिवनेरीनगर, लेन नं. ३, फातीमा मस्जिदजवळ बैठेघर, कोंढवा, पुणे (टोळी सदस्य) ४) अझहर इरफान सदस्य उर्फ अज्जु, वय २८ वर्षे, रा. गल्ली नं. ३०, भाग्योदयनगर, मक्का मस्जिद गेट नं. २, कोंढवा खुर्द, पुणे ( टोळी सदस्य)
( बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, दुखापत करणे, मारहाण करणे, धमकावणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी करणे, सार्वजनिक | मालमत्तेचे नुकसान करणे, चोरी करणे यासारखे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.

( तडीपार कालावाधी ०२ वर्षा करीता )

५ ) वानवडी पोलीस स्टेशन

१) राहुल उर्फ विकी रामु परदेशी, वय ३५ वर्षे, रा. घ.नं. ५३२. ०२ वर्षाकरीता नोबल बेकरीशेजारी, वानवडी गांव, पुणे (टोळी प्रमुख)
२) विशाल राजु सोनकर, वय २६ वर्षे, रा. घ.नं. ५३२, नोबल बेकरीशेजारी, वानवडी गांव, पुणे (टोळी सदस्य )
३) सुनिल रामु परदेशी, वय ३० वर्षे, रा. घ.नं. ५३२, नोबल बेकरीशेजारी, वानवडी गांव, पुणे (टोळी सदस्य )
( दुखापत करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे, | सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, विनयभंग करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.

( तडीपार कालावाधी ०२ वर्षा करीता )

उपरोक्त नमुद सर्व तडीपार इसम हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
माहे जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पावेतो १६ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच १० मोका कारवाईमध्ये ६७ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आज पावेतो ३१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण ११४ सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हें त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करीत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

error: Content is protected !!