संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ प्रमाणे एकुण ०६ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.
१ ) हडपसर पोलीस ठाणे
आरोपीचे नाव
इम्तीयाज इद्रीस मेमन, वय ४५ वर्षे, रा. स.नं. १५, विठ्ठलनगर, जिजामाता वसाहत, हडपसर, पुणे (खंडणी मागणे, धमकावणे, फसवणुक करणे, शिवीगाळ करणे यासारखे एकुण ०६ दखलपात्र अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत .
तडीपार कालावधी
०२ वर्षाकरीता
२ ) वानवडी पोलीस ठाणे
आरोपीचे नाव
गणेश बबन लोंढे, वय २४ वर्षे, रा. राधिका चव्हाण यांचेकडे भाड्य तरवडे वस्ती, महंमदवाडी रोड, हडपसर, पुणे (सरकारी नोकरावर हल्ला करणे, चोरी करणे, दुखापत करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे, बलात्कार करणे यासारखे एकुण १९ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत . )
तडीपार कालावधी
०२ वर्षाकरीता
३ ) वानवडी पोलीस ठाणे
आरोपीचे नाव
अविनाश अजय मिसाळ, वय २४ वर्षे, रा. घोरपडी बाजार पोलीस चौकीच्या मागे, घोरपडी, पुणे ( बेकायदेशीर जमाव जमविणे, मारहाण करणे, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत .
तडीपार कालावधी
०२ वर्षाकरीता
४ ) कोंढवा पोलीस स्टेशन
आरोपीचे नाव
हुसेन अब्बास पटेल, वय २३ वर्षे, रा. स.नं. २३, गणराज पार्कजवळ, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे ( दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, मारहाण करुन धमकावणे,
बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण ०५ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत .
तडीपार कालावधी
०२ वर्षाकरीता
५ ) कोंढवा पोलीस स्टेशन
आरोपीचे नाव
आकाश नरसया गुत्तेदार, वय २४ वर्षे, रा. स.नं. ५, पवार वस्ती, केशवनगर, मुंढवा, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत .
तडीपार कालावधी
०२ वर्षाकरीता
६ ) कोंढवा पोलीस स्टेशन
आरोपीचे नाव
आदित्य तानाजी पांडागळे, वय २० वर्षे, रा. भैरवनाथ मंदिराच्या पाठीमागे, काटे चाळ, कोंढवा खुर्द, पुणे ( खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण ०३ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत .
तडीपार कालावधी
०२ वर्षाकरीता
उपरोक्त नमुद सर्व तडीपार इसम हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.
माहे जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पावेतो १३ सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच ९ मोका कारवाईमध्ये ५६ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आज पावेतो २५ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण ९४ सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करीत आहोत.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























