संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर !
दिनांक २२/०४/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक ०२ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अंमलदार परीमंडळ ०६ हददीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आदर्श नगर ते उरुळी देवाची कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याचे शेजारील मोकळ्या जागेत एक इसम गावठी पिस्टल कंबरेला लावुन फिरत आहे. सदरची बातमी वरीष्ठांना कळविली असता त्यांनी खात्री करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याने मिळालेल्या बातमीचे ठिकाणी जावुन खात्री केली असता एक विधीसंघर्षीत बालक मिळुन आला. त्याचे ताब्यात ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व ०१ जिवंत काडतुस मिळुन आलेने सदर विधीसंघर्षित बालकाविरुदध फुरसुंगी पोलीस स्टेशन गु.र.नं.१७०/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस स्टेशन करीत आहे.
नमुद कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर (अतिरिक्त कार्यभार, गुन्हे), श्री विवेक मासाळ, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २, श्री राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने यांचे सुचनांप्रमाणे पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कारखेले, प्रदिप परीट, दयानंद गायकवाड यांनी सदरची कामगिरी केली.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























