Homeक्राईमपुण्यात खंडणी विरोधी पथक २ ची मोठी कारवाई – ३ सराईत आरोपी...

पुण्यात खंडणी विरोधी पथक २ ची मोठी कारवाई – ३ सराईत आरोपी अटक, गावठी पिस्टलसह BMW जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

मा. वरिष्ठांचे आदेशाने पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत दिनांक १८/०४/२०२६ ते २४/०४/२०२६ रोजी पर्यंत अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेवुन कारवाई करणेबाबत ओदशीत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने दिनांक २३/०४/२०२६ रोजी खंडणी विरोधी पथक ०२ कडील पोउपनि गौरव देव, पोलीस हवा. २४७१ सुरेंद्र जगदाळे, पोलीस हवा. ७४४९ दिलीप गोरे व पोलीस शि. ९८१५ पवन भोसले, पोलीस अंमलदार आझाद पाटील असे मिळुन परिमंडळ ६ हददीत पेट्रोलींग करत होते.

पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार पवन भोसले व पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी ओमकार बाळासाहेब घुले व नारायण विश्वानाथ पुरी हे पांढऱ्या रंगाचे BMW कार मध्ये उंड्री भागत फिरत असुन त्यांचेकडे गावठी पिस्टल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीचा आशय वरीष्ठांना सांगीतला असता त्यांनी खात्री करुन उचीत कारवाई करण्याचे आदेश दिले. मिळालेल्या बातमीप्रमाणे उंड्री चौक ते महमदवाडी रोड येथे जयराज वॉशिंग सेंटर समोर, सार्वजनिक रोडवर, उंड्री पुणे थांबुन रोडने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनामध्ये पाढऱ्या रंगाचे BMW कार चेक करीत असताना १९/०५ वा. चे सुमारास उंड्री वरुन महमदवाडी कडे जाणाऱ्या रोडवर एक पांढऱ्या रंगाची BMW कार नंबर एम एच १२ एफ. यु ९१८९ येत असल्याची दिसली तीच्यावर सशंय आल्याने पोउपनि गौरव देव साहेब व नमुद स्टाफाचे साह्याने कारला रस्त्याचे बाजुस घेतली. त्यात १) ओमकार बाळासाहेब घुले, वय २७ वर्षे, धंद मजुरी, रा. सव्र्व्हे नंबर १३२, दुर्वाकुर बिल्डींग, भैरवनाथ मंदिराचे मागे उंड्री पुणे. २) नारायण विश्वनाथ पुरी, वय २७ वर्षे, रा. साईराज पेट्रोलपंपा समोर, गल्ली नंबर ०४, सार्थक लॉज समोर हंडेवाडी पुणे व ३) स्वप्निल नंदकुमार हिरेमठ, वय २५ वर्षे, रा. बालाजी पदमावती नगर पिसोळी, गंगन लाविश सोसा. शेजारी, पिसोळी पुणे असे रेकॉडवरील ०३ आरोपी मिळुन आले. नमुद इसमांची अगंझडीत घेता इसम नामे ओमकार बाळासाहेब घुले याचे पॅन्टचे मागील बाजुस कमरेला ०१ गावठी बनावटीचे पिस्टल व नारायण पुरी याचेकडे ०१ जिवंत काडतुस मिळुन आले. असा एकुण ७,४०,५०० रुपयाचा मुददेमाल मिळुन आला. त्याचेवर काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१८३/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास काळेपडळ पोलीस स्टेशन करत आहे. वर नमुद ०३ आरोपीतांवर पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री विवेक मासाळ, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोउपनि गौरव देव, पोलीस हवा. सुरेंद्र जगदाळे, पोलीस हवा. दिलीप गोरे व पोलीस अंमलदार पवन भोसले, पोलीस अंमलदार आझाद पाटील यांनी सदरची कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!