Homeताज्या बातम्या“पुणे शहर वाहतूक पोलिसांचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह आरोपींसाठी विशेष...

“पुणे शहर वाहतूक पोलिसांचा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह आरोपींसाठी विशेष समुपदेशन कार्यक्रम.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक ०९.०२.२०२६ रोजी दुपारी ११.०० ते १४.०० या कालावधी मध्ये पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर येथे विशेष समपदेशन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम मा. श्री रंजन कु मार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमामध्ये मोटार वाहन कायद्याअंतर्गत सन २०२५ मध्ये ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कारवाई करण्यात आलेल्या आरोपी वाहनचालक यांना समक्ष बोलवून समुपदेशन करण्यात आले. वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणे, सुरक्षित वाहन चालविणे व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा अभियान विषयावर सोशल मिडीया, पीटीपी ॲपचे सादरीकरण करण्यात आले. तसेच दारू पिऊन वाहन चालवण्याचे गंभीर परिणाम, अपघातांमुळे होणारी जीवितहानी, कायदेशीर तरतुदी व शिक्षा याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
दारू पिऊन वाहन चालवणे हा केवळ कायद्याचा भंग नसून, समाजासाठी घातक असल्याचे स्पष्ट करण्यात आले तसेच सुरक्षित व जबाबदारीने वाहन चालविणे याबाबत आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास सुमारे ५५० – ६०० आरोपी वाहनचालक उपस्थित होते. उपस्थितांनी समुपदेशनाचा लाभ घेतला. तसेच यापुढे अशा प्रकारची चुक न करण्याची व वाहतूक नियमांचे पालन करण्याची पोलीसांना हमी दिली.
पुणे शहर वाहतूक पोलीस विभागामार्फत भविष्यातही अशा प्रकारचे जनजागृती व समुपदेशन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तसेच सर्व वाहतूक विभागांना सुचित करण्यात आले की, यापुढे ही ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह बाबत विशेष अभियान राबवून, या पेक्षा जास्त कठोर कारवाई करण्यात यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!