Homeक्राईमपुणे गुन्हे शाखा युनिट-४ची मोठी कामगिरी मांजरी येथे गावठी पिस्टल व दोन...

पुणे गुन्हे शाखा युनिट-४ची मोठी कामगिरी मांजरी येथे गावठी पिस्टल व दोन जिवंत राऊंड जप्त, आरोपी ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! युनिट ४ गुन्हे शाखा, पुणे शहर !

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अजय वाघमारे, युनिट -४ गुन्हे शाखा पुणे शहर यांनी महानगर पालिका निवडणुक २०२६ च्या अनुषंगाने युनिट-४ हद्दीतील अभिलेखा वरिल घरफोडी करणारे, वाहन चोरी, मोबाईल चोरी, जबरी चोरी करणारे, मोक्का केस मधील जामीनावर सुटलेले आरोपी, एमपीडीए केस मधील स्थानबध्दता संपुष्टात आलेले आरोपी तसेच खुन, खुनाचा प्रयत्न, शरीराविरुध्दचे गुन्हे, दरोडा, दरोडयाची तयारी, खंडणी, अपहरण, घरफोडी, एनडीपीएस, जुगार इ. गुन्हे, रेकॉर्डवरील आरोपी चेक करणेबाबत आदेश दिले.
दिनांक ०९/०१/२०२६ रोजी युनिट-४ चे पथक चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत प्रतिबंधात्मक, पेट्रोलिंग करीत असताना पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, एक संशयित इसम वय अंदाजे २२ ते २५ वर्षे, हा झेड कॉर्नर, चाळीस फुटी रोड, वेदांत सोसायटी, समोर, मांजरी पुणे येथे मोकळया जागेत बसलेला असुन त्याने अंगामध्ये हिरव्या, पांढ-या, पिवळ्या रंगाचे फुलबाहयाचे स्वेटर व राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. सदर इसमाकडे गावठी पिस्टल आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाली. सदरची बातमी मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे यांना कळविली असता त्यांनी खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे युनिट-४ पथकाने बातमीतील वर्णनाचे संशयित इसमास ताब्यात घेवुन त्यांचे नाव-पत्ता विचारता त्याने आपले नाव आदित्य अमोल ढसाळ, वय- २२ वर्षे, रा. वेदांत सोसायटी बी-विंग, पहिला मजला फ्लॅट नं. १०२, चाळीस फुटी रोड झेड कॉर्नर मांजरी पुणे असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडुन एक देशी बनावटीची पिस्टल व मॅगझीन मध्ये दोन जिवंत राऊंड असे एकूण ५२,०००/- रू. किंमतीचा मुददेमाल मिळून आलेने सदर आरोपी विरुध्द मांजरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.२७/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम, ३७ (१) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करुन सदर आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कायदेशीर कारवाई करीता मांजरी पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. पंकज देशमुख, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे २, श्री. राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट- ४, गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, सहा.पोलीस निरीक्षक, अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक, वैभव मगदुम, सहा. पोलीस फौजदार, प्रविण राजपुत, एकनाथ जोशी, पोलीस अंमलदार तुषार खराडे, किशोर दुशिंग, संजय आढारी, विनोद महाजन, सुभाष आव्हाड, विठ्ठल वाव्हळ, प्रविण भालचीम, विशाल इथापे, मयुरी नलावडे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!