Homeक्राईमन-हे पोलीसांची कारवाई : सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.

न-हे पोलीसांची कारवाई : सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल व जिवंत काडतूस जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! न-हे पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक ३०/०३/२०२६ रोजी न-हे पोलीस स्टेशन कडील पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे व पोलीस अंमलदार असे पोलीस स्टेशनचे हद्दीत अवैध धंदयावर कारवाई तसेच आरोपी चेक करीत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण व शाहु राठोड यांना त्यांचे बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, एक इसम मानस ग्राऊंड पुणे या ठिकाणी संशयरित्या फिरत असुन त्याचेकडे एक पिस्टल आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक न-हे पोलीस स्टेशन पुणे यांना कळविली असता त्यांनी बातमीची खात्री करुन योग्यती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले. सदर बातमीच्या अनुषंगाने नमुद ठिकाणी जावुन पाहणी केली असता एक इसम सदर ठिकाणी संशयीतरित्या फिरत असताना दिसला त्यास स्टाफचे मदतीने जागीच पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अमोल पदमाकर सोळंके वय २४ वर्षे रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी पुणे सध्या पार्वती हाईटस, स्वामी समर्थ कंपनी (जाधवर इंडस्ट्रीज) नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या मागे पुणे असे असल्याचे सांगितले. सदर इसमाची झडती घेतली असता त्याचेकडे एक लोखंडी पिस्टल व ०१ जिवंत राऊंड मिळुन आले. त्याअनुषंगाने सदर इसमावरती न-हे पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १२५/२०२६ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) महा. पो. अधि.३७,१,३ सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास किरण लिटे पोलीस उपनिरीक्षक न-हे पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परीमंडळ ३. पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे शहर श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. आसाराम शेटे यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक किरण लिटे, पोलीस अंमलदार संजय शिंदे, निलेश भोरडे, देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, शाहु राठोड व कांतीलाल धोत्रे यांचे पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!