Homeक्राईमज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या रावण टोळीला गुंडा विरोधी पथकाने केले...

ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या रावण टोळीला गुंडा विरोधी पथकाने केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक १७/०९/२०२५ रोजी ०८:५० वा. गुंडा विरोधी पथकातील पो.हवा. १७२९ बाबा, ३०३९ दळवी व पो.शि. २८७९ कदम यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, पाटीलनगर पाण्याच्या टाकीच्या पुढे, खदाणीजवळ इंद्रायणीनदीच्या कडेला कच्च्या रस्त्यावर दोन चारचाकी पांढऱ्या रंगाच्या गाड्या उभ्या असुन त्यामध्ये ०८ ते ०९ संशयित इसम असुन त्यांच्याकडे हत्यारे आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी ही सहा. पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने यांनी आम्हास कळविले असता सदर बातमी वरीष्ठांना कळवुन त्यांचे सुचना व मार्गदर्शना प्रमाणे गुंडा विरोधी पथकातील सहा. पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने व स्टाफ यांच्या वेगवेगळ्या टिम बनवुन सदर ठिकाणी जाऊन बातमी प्रमाणे कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे गुंडा विरोधी पथकाने सापळा रचुन पो. हवा. १६०४ चौधरी यांचे मार्फत बातमीची खात्री करुन स्टाफचे मदतीने छापा घातला. सदर छाप्यामध्ये एकुण ०९ इसम मिळुन आले आहे. त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारणा करता त्यांनी त्यांची नावे १) अनिरुध्द उर्फ बाळ्या उर्फ विकी राजु जाधव वय २८ वर्षे रा. जाधववस्ती डी मार्टचे मागे, रावेत पुणे व ( स्वीफ्ट कार नंबर प्लेट नसलेली या गाडीत बसलेले इसमांनी त्यांनी त्यांची नावे) अनुक्रमे २) अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार वय २२ वर्षे रा. तुषार वाल्हेकर यांचे खोलीत भाड्याने, भोंडेवस्ती मोरया कॉलनी वाल्हेकरवाडी चिंचवड पुणे ३) यश उर्फ गोंद्या आकाश खंडागळे वय २१ वर्षे रा. पीसीएमसी कॉलनी बिल्डींग नं. ०९, रुम नं. ४३, अंकुश चौक, निगडी पुणे, ४) शुभम गोरखनाथ चव्हाण वय ३० वर्षे रा. फ्लॅट नं. बी ११ सुखवाणी प्लाझा आकुर्डी पुणे असे सांगितले. तसेच ऑडी कारमध्ये ५) प्रद्युमन राजकुमार जवळगे वय २५ वर्षे रा. मेदनकरवाडी बंगलावस्ती चाकण ता.खेड जि.पुणे व ऑडी कारमध्ये बसलेले इसमांनी त्यांची नावे ६) सोहन राजु चंदेलिया वय २३ वर्षे रा. जाधववस्ती डी मार्टचे मागे, रावेत, पुणे व ०३ विधीसंषर्धीत बालक
होते.
सदर पकडलेल्या इसमांपैकी अनिरुध्द उर्फ बाळ्या उर्फ विकी राजु जाधव यांचे कडे हत्यारा बाबत विचारपुस करता त्याने “आम्ही ०९ जण मिळुन पाटीलनगर चिखली येथील ज्वेलर्सचे दुकानावर दरोडा टाकुन पळुन जाणार होतो” असे सांगुन गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्यावेळी पो. उप-नि समिर लोंढे यांनी स्वीफ्ट व ऑडी कार मधुन दरोडा घालण्यास लागणारे पिस्टल, राऊंड, लोखंडी कोयता, गुप्ती, मिरची पुड, बांबु, रस्सी असे एकुण १५,२५,९७४/- रुपये किंमतीचे साहीत्य जप्त केले आहेत. वरील आरोपी विरुध्द पो.उप.नि समीर लोंढे यांनी चिखली पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे.

तरी सदर आरोपींना चिखली पो. ठाणे गुरनं. ६११/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (४), ३१०(५), आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ मध्ये पुढील कार्यवाही कामी चिखली पो. ठाणे येथे हजर करण्यात आले आहे. नमुद गुन्हयातील आरोपींना तपासी अधिकारी यांनी अटक केली असता त्यांना ०४ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे साो., मा. सह पोलीस आयुक्त, श्री. शशिकांत महावरकर साो., मा. अपर पोलीस आयुक्त श्री. एस. डी. आवाड सो., मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार साो., मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे – १, श्री. विशाल हिरे सो., यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच. व्ही. माने, पोउपनि समिर लोंढे, ग्रेड पोउपनि पी.पी. तापकीर, स.पो.फौ. एस. एन. ठोकळ, स. पो.फौ. व्ही. एच. जगदाळे, स.पो.फौ. ए. पी. गायकवाड, पो. हवा ४८० जी.डी. चव्हाण, पो. हवा १६०४ एस. डी. चौधरी, पो. हवा ९५६ व्ही. टी. गंभीरे, पो.हवा २९२० जी.एस. मेदगे, पो.हवा. १७२९ एस.पी. बाबा, पो.हवा. १७२८ एन.बी. गेंगजे, पो.हवा, १७८८ व्ही.डी. तेलेवार, पो.हवा. ३०३९ एम.एस. दळवी, पो.शि २८१२ आर. के. मोहीते, पो.शि. २०८४ व्ही. एन. वेळापुरे, पो.शि. २५८७ एस.पी. घारे, पो.शि. २८६४ डी.व्ही. गिरी, पो.शि २८४९ एस.टी. कदम, पो.शि २३८४ टी.ई. शेख यांनी केली आहे.
पुर्व इतिहास :-
( डॉ. शिवाजी पवार ) पोलीस उप आयुक्त (गुन्हे) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
१) आरोपी नामे :- अनिरुध्द उर्फ बाळ्या उर्फ विकी राजु जाधव (मोक्यातील सराईत गुन्हेगार ) १. निगडी पोलीस ठाणे गुरनं. ११४ / १६ भा.द.वि. कलम ३६४, १४३, १४७, १४९, ३२४, ५०६ .
२. देहुरोड पोलीस ठाणे गुरनं. १९९ / १६ भा.द.वि. कलम ३९५, ३९७, ३२३, ५०४, ५०६ आर्म अॅक्ट ३(२५), ४(२५), म.पो.का. कलम ३७ (१) (३) सह १३५.
३. देहुरोड पोलीस ठाणे गुरनं. ५९१/१७ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ३ (२५) (२७), ४ (२५) (२७).
४. देहुरोड पोलीस ठाणे गुरनं. ५९१/१७ भा.द.वि. कलम ३०७, ३२४, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ३(२५)(२७), ४(२५) (२७).
५. वाकड पोलीस ठाणे गुरनं. ३८९/२०१८ आर्म अॅक्ट ३ (२५) म.पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५. ६. चिंचवड पोलीस ठाणे गुरनं. २१९/२०२० आर्म अॅक्ट ३ (२५) म.पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५. ७. देहुरोड पोलीस ठाणे गुरनं. ४०४/२०२१ आर्म अॅक्ट ३ (२५), ४(२५), म.पो. का. कलम ३७(१) (३)
सह १३५.
८. जळगाव चोपाडा गुरनं. १४३ / २०२१ भा.द.वि. कलम ३०७, १२०(ब) ३६३, ३३७,३३८,,४२७ आर्म अॅक्ट ३ (२५), म.पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५.
९. देहुरोड पोलीस ठाणे गुरनं. ५८४/२०२१ आर्म अॅक्ट ३ (२५).
१०.उत्तमनगर पोलीस ठाणे गुरनं. १८८/२०२१ भादवि ३०७, १२०(ब), २०१, १४३, १४७, १४९, ३७(१)(३) १३५ आर्म अॅक्ट ३(२५),(२७),७.
२) यश उर्फ गोंद्या आकाश खंडाळे
१. निगडी पो. ठाणे गुरनं. १९५/२०२० भादवि कलम ३०२, ३०७, ५०४, १४१, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४(२५)(२७), क्रिमीनल अ. अॅक्ट ३ सह ७.

. निगडी पो. ठाणे गुरनं. ४२९/२०२५ भादवि कलम ३०९ (६), ३(५), आर्म अॅक्ट ४(२५) (२७), क्रिमीनल
अ.
अॅक्ट ३ सह ७. म.पो. का. कलम ३७ (१) (३) सह १३५.
३) सोहन राजु चंदेलिया ( तडीपार )
१. रावेत पो. ठाणे गुरनं. ६७ / २०२२ एनडीपीएस अॅक्ट ८ (क), २०(ब).
२. रावेत पो. ठाणे गुरनं. २६२ /२०२३ एनडीपीएस अॅक्ट ८ (क), २०(ब).
३. शिरगाव परंदवडी पो. ठाणे गुरनं. ७२/ २०२५ एनडीपीएस अॅक्ट ८ (क), २०(ब).
४. रावेत पो. ठाणे गुरनं. ३९५/२०२३ आर्म अॅक्ट ४ (२५).
४) अभिषेक उर्फ बकासुर चिमाजी पवार
१. नेवासा पो. ठाणे गुरनं. ४१६ / २०२२ भादवि कलम ३५४ व इतर.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...
error: Content is protected !!