मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *
! चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर !
वयोवृद्ध महिलेची देखभाल करण्यासाठी कामवर ठेवलेले महिलेचे घरामधुन ०२,७०,०००/-रुपयांचे दागीने चोरी करुन फरार झालेल्या आरोपी महिलेस घनसोली, ठाणे येथुन अटक करुन चोरीला गेलेले सर्व दागीने हस्तगत केलेबाबत.
दिनांक १३/०६/२०२६ रोजी सकाळी ०७:४५ वा. सुमारास कृष्णाई बंगलो, साईनाथ हौसींग
सोसायटी, स.नं. ४२, वडगावशेरी, पुणे येथे शेखर यशवंत पळशीकर यांनी त्यांचे वयोवृद्ध आई वडीलांची देखभाल करण्यासाठी कामावर ठेवलेली महिला नामे स्वाती मोरे सध्या रा. मुंबई मुळ रा. सातारा हीने शेखर यशवंत पळशीकर याचे आईच्या अंदाजे ४ तोळे वजनाच्या सोन्याच्या पाटल्या व ५ ग्रॅम वजनाची सोन्याची कर्णफुले असा एकुण २,७०,००००/- रु. माल लबाडीच्या इराद्याने चोरी करुन नेला म्हणुन यातील फिर्यादी यांनी दिनांक २८/०६/२०२६ रोजी चंदननगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेवरुन चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु. र. नं. २९४/२०२६ भा. न्या. सं. कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यातील आरोपी महिलेचे संपूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नसल्याने सदरचे गुन्ह्याचे तांत्रीक विश्लेषन करुन चंदननगर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी यातील महिला आरोपी स्वाती विजय मोरे वय ३७ वर्षे रा. फ्लॅट नं.९१२, ९ वा. मजला, लोढा क्राऊन व्हीवा, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) हीची संपुर्ण माहीती प्राप्त करुन तीला दिनांक ०२/०७/२०२६ रोजी सकाळी ०९:१० या. कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे शहर येथे ताब्यात घेऊन तीचेकडे दाखल गुन्ह्याबाबत सखोल तपास करुन तीने सदरचे गुन्ह्यामध्ये चोरलेले २,४०,०००/-रु. किं. ३८.२०० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या एकुण ०२ बांगड्या व ३०,०००/-रु.किं. ५.२०० ग्रॅम वजनाची सोन्याची २ कर्णफुले असा एकुण २,७०,०००/- रु. किं. मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे, नेमणुक चंदननगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०७, पुणे शहर श्री. अबिनाश कुमार, मा. सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर- श्री. सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर पोलीस स्टेशन श्रीमती, अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल धस यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्री. गणेश जगदाळे, तसेच तपास पथकाचे पोहवा. ६८३५ मेमाणे, पोहवा. ६३११ घावटे, पोहवा. ३२७२ घुटे, पोअं. २२४९ लहाणे, पोअं.५००७ पाटील, पोअं, २७४४ बेंद्रे, पोअं. २१०६ गायकवाड व मपोशि. ५४३८ बायसकर यांनी केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























