Homeक्राईमआगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सराईत ०३ आरोपीताकडून एकुण...

आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी सराईत ०३ आरोपीताकडून एकुण ०४ गावठी पिस्टल व ०५ जिवंत काडतूसे जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पणे शहर !

आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी पुणे शहर कार्यक्षेत्रातील पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कोंबिंग ऑपरेश राबवून पोलीस ठाणे हद्दीत कोबिंग ऑपरेशन दरम्यान अवैद्य धंदे, अभिलेखावरील आरोपीत इसम तडीपार इसम, अग्निशस्त्र बाळगणारे गुन्हेगार यांना चेक करणेबाबत आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तपास पथकाकडील अधिकारी व अंमलदार हे काळेपडळ पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात पेट्रोलिंग करीत असताना, पोलीस अंमलदार शाहीद शेख व दाऊद सय्यद यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, पोलीसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इसम नामे :- आशिफ सबीरखा तेली, वय २१ वर्षे, रा. गल्ली नं. १५, सय्यदनगर, हडपसर, पुणे हा हेवनपार्क व लक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता, पालखी रोड मार्ग, महंमदवाडी, पुणे येथे त्याच्या दोन साथीदारांसह थांबलेला असून ते कोणता तरी दखलपात्र गुन्हा करणेचे उद्देशाने आपले कब्जात काहीतरी संशयित चिजवस्तु जवळ बाळगुन वावरत असुन संशयित चिजवस्तु हि अग्निशस्त्र असण्याची दाट शक्यता आहे. अशी बातमी मिळताच, सदर ठिकाणी पोलीस उप निरीक्षक गुरव यांनी सदरबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मानसिंग पाटील यांना कळविले असता, त्यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी.विनायक गुरव व पोलीस स्टाफ असे हेवनपार्क व लक्ष्मीपार्क कडे जाणारा मधला कच्चा रस्ता, पालखी रोड मार्ग, महंदवाडी, पुणे येथे सर्व टिमला दिलेल्यां सुचनांप्रमाणे जावुन सर्वांनी मिळालेल्या माहितीची खात्री केली असतां, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे आशिफ सबीरखा तेली, व त्याचे दोन साथीदार नामे यश सुभाष मदने, वय २० वर्षे, धंदा – मजुरी, रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती, पुणे, प्रथमेश संदीप लोंढे, वय २४ वर्षे, रा.बागवान यांच्या घरात भाडयाने वडगाव निंबाळकर, निरा रोड, बारामती, पुणे हे पोलीसांना पाहून संशयितरित्या व कावरे बावरे स्थितीत आढळुन आलेने सर्व टीमने चोहोबाजूने त्यास घेराव घालून ताब्यांत घेतले. त्यावेळी त्यांची दोन पंचा समक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे ०४ पिस्टल व ०५ जिवंत राऊंड असा एकुण २,४२,०००/- रुपयांचा मुद्देमाल मिळुन आला आहे. तरी नमूद इसम आशिफ सबीरखा तेली, यश सुभाष मदने, प्रथमेश संदीप लोंढे यांच्यावर बीएनएस कलम ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद आरोपीतास अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पो.नि.गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव, पो.हवा. प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, संजय बागल,अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खुनातील आरोपीला मार्केटयार्ड पोलीस ठाणेच्या तपास पथकाने शिताफीने अवघ्या सहा तासात केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर ! गंगाधाम चौकामधे दिनांक २०/०४/२०२६ रोजी पहाटे ०४:४५...

लग्नाचे आमिष, अत्याचार आणि व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल — बिबवेवाडी पोलिसांची तात्काळ कारवाई, आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे.शहर ! बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ८२/२०२६, भारतीय न्याय...

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

error: Content is protected !!