संपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
* भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर *
दिनांक ०४/०५/२०२६ रोजी रात्री ०९.१५ वा चे सुमारास निलगीरी चौक आंबेगाव पठार, पुणे येथे विधीसंघर्षीत बालक याने फिर्यादी यांचा मुलगा नयन सचिन जाधव, वय १८ वर्षे, रा. फ्लॅट नं. ०४ चौथा मजला, शिवकृपा अपार्टमेन्ट, साई-सिध्दी चौक, आंबेगाव पठार पुणे याचे सोबत दोन दिवसांपुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन, त्याचे साथीदारांचे मदतीने नयन याचे डोक्यावर लोखंडी धारधार हत्याराने वार करून, तसेच सिमेन्टचे ब्लॉक त्याच्या डोक्यामध्ये मारुन, त्यास जिवे ठार मारले आहे म्हणुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर १८०/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१), ३(५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्हयातील मुख्य विधीसंघर्षीत बालक याचा शोध घेत असताना मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मितेश चोरमोले हे शोध घेत असताना, तो त्याचे साथीदारांसह सातारा रोडवरील वेळु गावाजवळ थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे नमुद अधिकारी व अंमलदार यांनी वेळु गावाजवळ जाऊन त्यांचा शोध घेतला असता गुन्हयातील मुख्य विधीसंघर्षीत बालक हा गुन्हा करते वेळी असलेल्या दोन विधीसंघर्षीत बालकांसह मिळुन आला. त्यांचेकडे दाखल गुन्हयाचा तपास करीत असताना त्यांनी सदर गुन्हा त्यांचे दोन साथीदारांसह केल्याचे सांगितल्याने, त्यांचेकडुन प्राप्त माहीतीवरुन पोलीस अंमलदार महेश बारवकर, तुकाराम सुतार, किरण साबळे, मंगेश गायकवाड यांनी गुन्हयात सहभागी असलेला विधीसंघर्षीत बालकाचा शोध घेवुन त्यासे ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा.राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, सपोनि स्वप्निल पाटील, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार सचिन सरपाले, मितेश चोरमोले, महेश चारवकर, किरण साबळे, मंगेश गायकवाड, तुकाराम सुतार, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, अभिनय चौधरी, सागर बोरगे, संदीप आगळे, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























