Homeक्राईमआंतरजिल्हा गांजा तस्करी करणायाएका महीलेसह एकुण ०३ आरोपी ताब्यात घेऊन ९६ किलो...

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणायाएका महीलेसह एकुण ०३ आरोपी ताब्यात घेऊन ९६ किलो गांजा व दोन चारचाकी वाहनासह ६३ लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त…

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन *

अंमली पदार्थविरोधी पथक गुन्हे शाखेचीधडककारवाई

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणा­याएका महीलेसह एकुण ०३ आरोपी अंमली पदार्थविरोधी पथकाचे ताब्यात,

आंतरजिल्हा गांजा तस्करी करणारे रॅकेट उघ्वस्त,

९६ किलो गांजा व दोन चारचाकी वाहनासह ६३ लाख रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त..

मा.पोलीस आयुक्त श्री विनयकुमारचौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैधविक्रीवर आळा घालणेकरीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटनकरणेबाबत आदेशीतकेले आहे.

मा पोलीस उप आयुक्त, गुन्हे संदिप डोईफोडे, मा सहा पोलीस आयुक्त, गुन्हे २ बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांनी अंमली पदार्थविरोधी पथकातीलसहा पोलीसनिरीक्षक सचिन कदम, विक्रम गायकवाड, पोउपनि ज्ञानेश्वर दळवी व पोलीसअंमलदार यांची वेगवेगळी पथकेतयारकरुनपिंपरीचिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणे करीता व अंमली पदार्थांचे समुळ उच्चाटन करणेबाबत आदेशीत केले. सपोनि विक्रम गायकवाड व पथक हे चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अधिकारी विक्रम गायकवाड व पोलीस अंमलदार निखिल वर्पे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, एम.एच.०३/अे.एम./८१८३ या सिल्व्हर रंगाचे टोयाटो इनोव्हा व एम.एच.१८/बी.आर./ ३४४२या पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इको या दोन वाहनांमध्ये गांजा हा अंमली पदार्थ असुन सदरची वाहने चाकण पोलीस स्टेशन हद्दीतील रोहकल फाटा येथुन जाणार आहेत. त्यांनी ती माहिती समक्ष वपोनि संतोष पाटील यांना कळविली असता त्यांनी तात्काळ दोन पथके तयार करुन बातमीमधील वाहनांचा शोध घेणेबाबत आदेशीत केले. त्याप्रमाणे रोहकल फाटा, पुणे नाशिक रोड येथे नाकाबंदी करत असतानासदर दोन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यातील इनोव्हा मध्ये ०१ इसम व मारुति इको या वाहनामध्ये ०१ इसम व ०१ महिला मिळुन आली. त्यंाना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १. संजय पांडुरंग मोहिते, वय ३९ वर्षे, रा गोवित्री, पोस्ट करंजगाव, ता मावळ, जि पुणे, २. मन्साराम नुरजी धानका, वय ४० वर्षे, रा हुरेपाणी, पोस्ट सांगवी, ता शिरपुर जि धुळे व महिला आरोपी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडील वाहनांची पंचांसमक्ष पाहणी केली असता त्यातील सिल्व्हर रंगाचे टोयाटो इनोव्हा मध्ये ०२ पांढरे रंगाची गांजा असलेली पोती तर पांढरे रंगाचे मारुती सुझुकी इको मध्ये ०४ पांढरे रंगाची गांजा असलेली पोती असे एकुण ०६ पोत्यांमधुन एकुण ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा मिळुन आला.

आरोपी नामे १. संजय पांडुरंग मोहिते, वय ३९ वर्षे, रा गोवित्री, पोस्ट करंजगाव, ता मावळ, जि पुणे, २. मन्साराम नुरजी धानका, वय ४० वर्षे, रा हुरेपाणी, पोस्ट सांगवी, ता शिरपुर जि धुळे व एक महिला आरोपी यांचे ताब्यातुन एकुण ६३३१२००/- किंमतीचा एकुण ९६ किलो २०४ ग्रॅम गांजा, ०३ मोबाईल, ०२ चारचाकी व रोख रक्कमजप्त करण्यात आली असुन त्यांचेविरुध्द चाकण पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(त्त्)(क), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी नामे संजय पांडुरंग मोहिते याचेविरुध्द पुढील प्रमाणे गुन्हें दाखल आहेत.

१) कामशेत पोलीस स्टेशन गु.र.क्र. ३२३/२०२३ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(त्त्)(क), २९

२) लोणीकाळभोर पोलीस स्टेशन गु.र.क्र. 52/2005 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(त्त्)(क), २९

सदर आरोपीविरुध्द हैद्राबाद येथे एक गांजा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहीती आहे.

सदरचीकारवाई मा. विनयकुमारचौबे, पोलीस आयुक्त,पिंपरीचिंचवड आयुक्तालय, मा. शशिकांत महावरकर, सह पोलीस आयुक्त, मा. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा.संदिप डोईफोडे,पोलीस उप आयुक्त, गुन्हे, मा. विशाल हिरे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 1, मा. बाळासाहेब कोपनर, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 2यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाचेवरिष्ठ पोलीसनिरीक्षकसंतोष पाटील, सहा पोलीसनिरीक्षक विक्रम गायकवाड, पोलीसअंमलदारप्रदिप शेलार, किशोर परदेशी, मयुर वाडकर, शिल्पा कांबळे, निखिल शेटे, निखिल वर्पे, कपिलेश इगवे, मितेश यादव, चिंतामण सुपे, सुनिल भागवत, महादेव बिक्कड तांत्रिक विश्लेषण विभागाचे प्रकाश ननावरे तसेच यांचे पथकानेकेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!