मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610
सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *
! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !
दि.२५/०६/२०२६ रोजी रात्री ०९/३० ते रात्री १०/०५ वा सुमारास फिर्यादी, वय-२५ वर्षे, रा. कोंढवा खुर्द, पुणे यांचा सोशल मिडीयावरील मित्र नामे यश हा फिर्यादी यांचे कोंढवा खुर्द, पुणे येथील घरी आला त्यावेळी फिर्यादी या त्याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या त्यांचे मावशीच्या घरी जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेल्या असता मित्र यश याने फिर्यादी यांचे बेडरुममधील लाकडी कपाटमध्ये ठेवलेल्या सोन्याचे दागीने व रोख रक्कम असे एकुण १४,३९,४९६/- रुपये किमतीचा ऎवज फिर्यादी यांचे संमतीशिवाय चोरी करून नेला आहे. म्हणुन कोंढवा पोलीस ठाणे पुणे गु.र.नं. ४९४/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकातील पो. अं ३५११ केशव हिरवे यांच्या तांत्रीक विश्लेषणाचे आधारे आरोपी हा वडोदरा, राज्य गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली असता दाखल गुन्हयातील आरोपी नामे यश (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांचा तपास पथकाकडील पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस हवालदार २८३ अमोल हिरवे, पोलीस अंगलदार १००७५ राहुल रासगे, पोलीस अंमलदार ३५११ केशव हिरवे यांनी गोरवा पोलीस ठाणे, गुजरात हद्दीमध्ये शोध घेतला असता तो सुभानपुरा, आईपीसीएल रोड, वडोदरा, गुजरात राज्य येथे मिळुन आल्याने त्यास पोलीस स्टाफने शिताफीने ताब्यात घेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव यश कैलास भुलचंदानी, वय २४ वर्षे, रा. गांव मोहाडी, तहसील बीजापुर, जिला म्हैसाणा, राज्य गुजरात असे सांगीतले. त्यावेळी त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून फिर्यादी यांचे बेडरुममधील लाकडी कपाटातील चोरी केलेले १६ तोळे वजनाचे सोन्याचे दागीने असा एकुण १४,३९,४९६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग रामदास इंगवले, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, मा. पोलीस निरीक्षक गुन्हे प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पोलीस उप-निरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस हवालदार २८३ अमोल हिरवे, पो.हवा. ५७८९ रविंद्र चिप्पा, पो.हवा. ६९५१ विशाल मेमाणे, पोहवा ३४०९ राहुल शितोळे, पोलीस अंमलदार ३५११ केशव हिरवे, पोलीस अंमलदार १००७५ राहुल रासगे, पो.अं. ८८३४ पुष्पेंद्र चव्हाण, पो.अं. ५८६५ अमित सुर्यवंशी, पो.अं. ९८३८ संतोष बनसुडे, पो.अं. १५९२ रियाज पटेल, पो. अं ४५०७ राहुल शेलार, पो.अं १३४९ रशिद शेख, पो.अं. ४९० सुरज शुक्ला, पो.अं. ७३३ शाहिद रजपुत, पो.अं. ८१२६ ओंकार शेटे यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























