Homeक्राईमनिर्जन खाणीत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा; गुन्हे शाखा युनिट 02 ची कौशल्यपूर्ण...

निर्जन खाणीत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा उलगडा; गुन्हे शाखा युनिट 02 ची कौशल्यपूर्ण कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनीट 02, पुणे शहर !

दि.10/02/2026 रोजी पुणे शहरातील दक्षिणे कडील कात्रज मांगडेवाडी येथील डोंगराळ भागात असलेल्या क्रशरखाणीमध्ये एका 40 वर्षीय महिलेचे खाणीतील खोल दरीमध्ये प्रेत मिळून आले होते. त्यावरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्रमांक 15 / 2026 अन्वये नोंद करण्यात आली होती. सदर घटनास्थळावर वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्या व घटनास्थळ निर्जनस्थळ डोंगराळ भागातील खाणीतील दरीचे ठिकाण असल्याने सदर मृत्यूबाबत संशय निर्माण त्याप्रमाणे तपास करण्याच्या मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री पंकज देशमुख साो, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखील पिंगळे साो यांनी सूचना दिल्या होत्या.
सदर अकस्मात मृत्यूचा गुन्हे शाखा युनीट 02, पुणे शहर प्रभारी अधिकारी अश्विनी जगताप यांनी त्यांचे पथकातील अधिकारी व अमंलदार यांना प्रामुख्याने व गांभीर्याने तपास करणेबाबत आदेशीत केले असता युनीट 02 यांनी त्यांची दोन पथके तयार करुन मयत महिला (नाव गोपनीय) हिचा संशयास्पद मृत्यूचा तपास सुरु केला असता सदर घटनास्थळ हे डोंगराळ भागातील असल्याने सदर ठिकाणी सी. सी. टी. व्ही कॅमेरे उपलब्ध नव्हते तसेच वैदयकीय अहवालानुसार सदर मयत ही घटनास्थळावर मिळून आल्याच्या किमान 24 तास आधी तिचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमीक अंदाज वर्तवला होता तसेच मयत महिलेच्या कुंटुबातील लोकांशी चर्चा केली असता सदर प्रकार हा आत्महत्या नसल्याबाबत खात्री पटल्याने यात घातपात असण्याची शक्यता निर्माण झाली.
त्याप्रमाणे मा वरिष्ठांनी सदर घटनास्थळापासून डोंगराळ भागापासून चारही बाजूला 3 कि मी परिसरातील तसेच सदर महिला राहत असलेल्या परिसरातील प्राप्त होतील तेवढे सी सी टी व्ही फुटेज संकलीत करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे महत्वपूर्ण असे 97 फुटेजची संकलीत करुन त्याची एकत्रीत पाहणी केली असता त्यामध्ये संशयीत 35 वाहने निवडली त्यातील प्रत्येकांची कसून चौकशी केली असता भारतनगर,कात्रज,पुणे या परिसरात राहणारा रिक्षाचालक नामे केशव कमलेश चौधरी, वय 20, रा सदर यांची देखील रिक्षा सदर वाहनामध्ये होती त्याच्याकडे चौकशी केली असता फुटेजमध्ये दिसत असलेल्या त्याच्या रिक्षाचे हूडमध्ये त्याने जाणीवपूर्वक बदल केलला दिसला त्यामुळे त्याच्यावरील संशय अधिक बळावला त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदर महिला ही कोंढवा ते कात्रज अशी शेअरींग रिक्षा समजून त्यास हात दाखविला होता तेव्हा त्याचे रिक्षामध्ये त्याचे नशेडी मित्र अब्दुल मोहमंद शेख, वय 23 वर्षे व सोनू लक्ष्मण पवार, वय 19 वर्षे दोन्ही रा. भारतनगर, रासकर पार्क पुणे असे होते. सदर महिलेस त्यांनी रिक्षामध्ये घेवून तिन तिस कात्रज येथील सृष्टी हॉटेल येथे सोडण्यास सांगितले असताना देखील तिस शॉटकर्टचा बहाणा सांगून मधल्या रस्त्याने मांगडेवाडी येथील डोंगरात घेवून गेले याठिकाणी सदर महिलेने मला इकडून का आणले म्हणून त्यांचेशी वाद केला तेव्हा सदर तिघांनी तिला मांगडेवाडी येथील खाणीतील दरीत फेकून देवून तिचा खून केल्याची कबुली  दिली सदर प्रकारामध्ये वरील आरोपीचे मित्र महादेव अर्जुन व्होरडे, साई अमित पूजारी, सोहेल हनीफ खान यांचाही सहभाग असल्याचे तपासात प्रथमदर्शनी आढळून आल्याने लागलीच वरील 06 इसमाना गुन्हे शाखा युनीट 02 कडील पथकाने ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली त्यांना पुढील तपासकामी भारतीविद्यापीठ पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिल्यावरुन सदर प्रकरणी गुन्हा रजि. क्रं. 61/ 2026 बीएनएस 103(1),3(5) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे अधिक तपास चालू आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, मा. सह. पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. पंकजदेशमुख, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री निखील पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – 1 श्री शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सपोनि श्री अमोल रसाळ व युनिट 2 कडील सपोउनि / संजय जाधव, पो हवा/विजय पवार,नागनाथ राख, सर्जेराव सरगर, योगेश मांढरे, शंकर नेवसे, संतोष टकले, शंकरकुंभार, अजीम शेख, विनोद चव्हाण, सददाम तांबोळी, साधना ताम्हाणे, संदीप शिर्के, प्रविण उत्तेकर, ओकार कुंभार, विशाल दळवी, रुषीकेश व्यवहारे, संजय आबनावे, विनायक वगारे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!