Homeक्राईमसीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने खुनाचा पर्दाफाश; काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

सीसीटीव्ही आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने खुनाचा पर्दाफाश; काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! काळेपडळ पोलीस स्टेशन पु

णे शहर !

दिनांक १२/०१/२०२६ रोजी सकाळी ०६/०० वाजता काळेपडळ पोलीस ठाणे हद्दीतील एका नायजेरीयन युवकास मारहाण झाली होती. त्यामुळे त्यांस उपचारकामी रुबी हॉस्पीटल वानवडी पुणे येथे अॅडमीट केले असता त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे. अशी खबर रुबी हॉस्पीटल वानवडी पुणे यांचेकडुन प्राप्त झाली होती. सदर प्राप्त खबरीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावून माहिती प्राप्त केली असता, सदर मयत युवकाचे नाव येमेका क्रिस्टीएन वय अंदाजे ३८ वर्षे रा. फ्लॅट नं. ७०६ शार्लिन अॅव्हेन्यू, सोसायटी धर्मावत पेट्रोल पंपाजवळ पिसोळी पुणे. मुळ नायझेरीया देश असे असुन, त्याचे सोबतचे ०४ मित्रांनी आपसात सगणमत करुन त्याचे डोक्यावर, पाठीवर, खांद्यावर, हातावर मारहाण करुन त्यांस गंभीर जखमी केले होते. त्यास रुबी हॉस्पीटल वानवडी येथे अॅडमिट केले असता, त्यांचा उपचार चालु असताना मृत्यु झाला आहे. सदर बाबत काळेपडळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम १०३, ३ (५), अन्वये दाखल करण्यात आला असुन, गुन्हयाचा तपास सपोनि विलास सुतार काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन, आरोपी हे नायजेरीयन असल्याने ते परदेशात जाण्याची शक्यता असल्याने तसेच त्यांचेबाबत कोणतीही उपयुक्त माहिती व सुगावा नसल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये तात्काळ तीन वेगवेगळे पथके तयार करुन, घटनास्थळी आजुबाजुचे लोकांकडुन व घटनास्थळावरील परिसरातील २५ ते ३० ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन, त्यांच्या सहाय्याने व गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील नायजेरीयन मारेकरी हे येवलेवाडी, पिसोळी व कॅम्प पुणे या परिसरामध्ये लपले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार तीन पथकातील अधिकारी व अंमलदार तात्काळ सदर ठिकाणी जावुन मिळालेल्या माहिती व आरोपीचे वर्णनानुसार नमुद ०३ नायजेरीन आरोपीत इसमांचा शोध घेवुन, त्यांना ताब्यात घेवून, त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्याचे नाव अनुक्रमे १. जॉनपॉल ओबिन्ना मोनेके (ओबी), २. ओजेंग्वा,३.नायेमेका मादूबुची ओनिया असे असल्याचे सांगितल्याने त्यांना तपासकामी पोलीस ठाणे येथे आणुन, दाखल गुन्हयाच्या अनुषंगाने वर नमुद आरोपीतांना वेगवेगळे करुन, त्यांचेकडे तपास केला असता, -” त्यांची मैंत्रिण ग्लोरी हिचेशी मयत येमेका क्रिस्टीएन हा बोलत असल्याचे व तिचे सोबत असलेल्या प्रेमप्रकरणाचे कारणावरून, यातील नायजेरीयन आरोपीतांनी मयत येमेका क्रिस्टीएन याचे सोबत वाद करुन, आरोपी नामे किन्सली, जॉनपॉल ओबिन्ना मोनेके (ओबी), ओजेंग्वा, व नायेमेका मादूबुची ओनिया यांनी मयतास गंभीर जखमी करुन, खुन केल्याची कबुली दिली आहे. त्यापैकी अटक केलेल्या नाजेरीयन आरोपीचे नाव ओबिन्ना ऊर्फ ओबी जॉनपॉल मोनेके वय ३७ वर्षे, रा.शालिना अव्हेन्यु पिसोळी पुणे. २)नायेमेका मादूबुची ओनिया वय ४२ वर्षे, रा.सदर असुन,३) ओजेंग्वा वय ४० वर्षे, रा. पिसोळी पुणे नायजेरीन देश यास ताब्यात घेण्यात आले आहे. करीता सदरचा गुन्हा हा उघडकिस आणला आहे.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ६ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, अतुल नवगिरे, वानवडी विभाग, पुणे शहर, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे सुचनेप्रमाणे सपोनि विलास सुतार, अमित शेटे, रत्नदीप गायकवाड, पोलीस उप निरीक्षक, विनायक गुरव, पुजा पाटील, व पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, किशोर पोटे, परशुराम पिसे, संजय बागल, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!